Kamali Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kamali Serial: 'कमळी' मालिकेतील दिवाळीत मोठा ट्विस्ट! कमळीचा होणार नवा मेकओव्हर, पण लग्नमंडपातून जाणार पळून

Kamali Serial: झी मराठीच्या कमळी मालिकेत दिवाळीत मोठा बदल होणार आहे. कमळीचा नवा मेकओव्हर, हृषीची साथ आणि लग्नातून कबड्डी स्पर्धेसाठी निघण्याचा निर्णय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Kamali Serial: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ३० जून २०२५ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेल्या दीड वर्षांपासून या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेतील कमळीच्या साध्या राहणीमानापासून ते तिच्या संघर्षापर्यंत प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना भावली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून चाहते कमळीच्या लूकमध्ये बदल करण्याची मागणी करत होते. आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कमळी नव्या आणि आकर्षक लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिकेच्या कथानकात सध्या अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. कमळीच्या भूतकाळातील सत्य उघडकीस आले असून ती महाजनांची मोठी नात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अन्नपूर्णा आजी आपल्या लाडक्या नातीचा मेकओव्हर करणार आहेत. आतापर्यंत दोन वेण्या आणि साध्या कपड्यांमध्ये दिसणारी कमळी आता पूर्णपणे बदललेल्या रूपात दिसणार आहे. कमळीच्या नव्या लूकमध्ये तिचे मोकळे केस, कपाळावर चंद्रकोर, नाजूक कानातले आणि सुंदर ड्रेस पाहायला मिळणार आहे. या नव्या रूपात कमळी खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे, केवळ कमळीच नाही तर तिची आई गौरी हिच्या लूकमध्येही बदल होणार आहे. त्यामुळे मायलेकींचे हे नवे रूप पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दरम्यान, मालिकेत कमळी आणि हृषीच्या लग्नाचीही चर्चा रंगणार आहे. आगामी भागांमध्ये दोघांचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. मात्र, या लग्नात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. लग्न सुरू असतानाच कमळी कबड्डीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी घरातून निघण्याचा निर्णय घेते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती लग्नातून पळून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, त्याच वेळी हृषी तिला अडवतो. यावेळी हृषी कमळीला म्हणतो, “स्वत:चं ध्येय पूर्ण करण्यासाठी जाताना अशी लपून का जातेस? जा गड जिंकून ये. मी इथेच तुझी वाट बघेन.”

एकीकडे कमळीचा नवा मेकओव्हर, तर दुसरीकडे तिच्या आयुष्यातील प्रेम आणि स्वप्नांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये नेमके काय घडणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ‘कमळी’ ही मालिका दररोज रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : मोठी बातमी! मध्यरात्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर पोलीस गाडीला आग

आई-बहिणीवर तलवारीने वार, नंतर प्रेयसीचं अपहरण; तिला संपवतो किंवा मी संपतो, प्रियकराचा पोलिसांसमोर थरार

Maharashtra News Live Update: शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

Ramayana Collection : रणबीर कपूरच्या 'रामायण'ची जगभरात जादू! दुसऱ्याच दिवशी २०० कोटी पार, बॉक्स ऑफिसवर रचला नवा विक्रम

Bedsheet Changing Tips: सणासुदीला नवीन बेडशीट बदलताय? जाणून घ्या नवीन बेडशीट किती दिवसांनी बदलावी?

SCROLL FOR NEXT