Lakshmi Niwas Zee Marathi Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lakshmi Niwas Marathi Serial: जान्हवी आणि भावनाच आयुष्य नव्या वळणावर; लवकरच जयंत - विश्वाचा होणार आमना- सामना

Lakshmi Niwas Zee Marathi Serial: झी मराठी वाहिनीवरील मालिका 'लक्ष्मी निवास' या मालिकेमध्ये सध्या अनेक नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. लक्ष्मी आणि निवासच्या मुलींच्या आयुष्यातही वेगळे वळन येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Lakshmi Niwas Marathi Serial: झी मराठी वाहिनीवरील मालिका 'लक्ष्मी निवास'मध्ये सध्या अनेक नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. लक्ष्मी निवासला त्याच्या आर्थिक संकटात खंभीरपणे मदत करते. तर एककीकडे लक्ष्मीच्या मुलींच्या आयुष्यात वेगळेच वळण येताना दिसत आहे. नवीन लग्न झालेली जान्हवी तिचा नवरा जयंतचे नवे रूप पाहून थक्क होतं आहे. तसेच, भावनाचा लग्न न करण्याचा विचार ऐकून सिद्धू अस्वस्थ झाला आहे.

लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतच विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत चाललंय. आता काय तर जाह्नवी जयंतसाठी टोपणनाव शोधू शकत नाही, म्हणून जयंत तिला शिक्षा देतो. पण तिचं दु:ख पाहून तो स्वतःलाही शिक्षा करतो. विश्वाच्या खोलीत तनूला जाह्नवीने दिलेली साखळी सापडते, त्यामुळे विश्वाला पुन्हा जाह्नवीची आठवण होते.दुसरीकडे, जयंत जाह्नवीचा फोन हातात घेतो आणि तिने विश्वाला पाठवलेल्या व्हॉइस नोट आपल्या फोनवर ट्रान्सफर करतो. ऑफिसमध्ये गेल्यावर तो संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकतो.

विश्वाने दिलेल्या उत्तरावरून जयंत या निष्कर्षावर पोहोचतो की जान्हवीने हे लग्न फक्त आणि फक्त विश्वाच्या आग्रहाखातर केला आहे. जयंत या "मॅड" विषयी माहिती गोळा करतो. जयंतचा गैरसमज वाढत चाललाय. जयंत विश्वाच्या मागावर असताना एका दुकानात पोहोचतो, जिथे जाह्नवीचं गाणं वाजत असतं, ज्यामुळे जयंत आणि विश्वा दोघंही भारावून जातात. जयंत चुकून विश्वा समजून दुसऱ्याच माणसाचा पाठलाग करतोय, आणि त्याला मारहाण करतो. जयंत, विश्वाला मारल्याच्या आनंदात जाह्नवीसोबत डिनर एन्जॉय करतो आणि ते दोघं काही रोमँटिक क्षण शेअर करतात.

तर दुसरीकडे भावना, गाडे-पाटील यांच्याशी बोलताना सांगते की तिचं संपूर्ण आयुष्य आनंदीभोवती फिरतं आणि तिच्या आयुष्यात दुसऱ्या प्रेमाला जागा नाही. हे ऐकून सिद्धू अस्वस्थ आहे. इकडे जयंतला आपलं घड्याळ हरवल्याचं लक्षात आल्यावर, जिथे मारहाण केली तिथे परत जाण्याचा निर्णय जयंत घेतो आणि तिथे गेल्यावर असा काही घडत जे पाहून प्रेक्षक हादरणार आहेत. जयंत आणि विश्वासचा सामना होणार का? भावनाचा लग्न न करण्याचा विचार सिद्धू बदलू शकेल का? बघायला विसरू नका "लक्ष्मी निवास" दररोज रात्री ८ वा. फक्त झी मराठीवर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : नाद करा, पण आमचा कुठं! भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अभिषेक- गिलने धू धू धुतलं

Laxman Hake: आरक्षणाचा वाद वाढणार; SC मधून 'या' समाजालाही आरक्षण द्या; लक्ष्मण हाकेंची नवी मागणी

India vs Pakistan: फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता सामना; कारण आलं समोर

Sahibzada Farhan Gun Celebration: वाह दुबे जी वा! स्लोअर बॉलवर ढेर अन् म्हणे 'गन' सेलिब्रेशन|Video Viral

Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

SCROLL FOR NEXT