Upcoming Marathi Serial SAAM TV
मनोरंजन बातम्या

Upcoming Marathi Serial: इच्छाधारी नागीणची जादू आता मराठीत; रहस्य-रोमान्सने उडवणार खळबळ, नव्या मालिकेची पहिली झलक

Icchadhari Nagin New Serial: आता लवकरच इच्छाधारी नागीणची गोष्ट मराठीत पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या पहिल्या झलकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

'नागीण' या मालिकेने आजवर हिंदीमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे. रोज संध्याकाळी 'नागीण' काहाणी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असायचे. या 'नागीण' मालिकेचे अनेक भाग देखील हिंदीमध्ये झाले आहेत.

सध्या 'झी मराठी'वर अनेक नवीन कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. त्यात आता अजून एका कार्यक्रमाची भर पडली आहे. नुकतेच वाहिनीने नवीन थ्रिलर मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. आता प्रेक्षकांचे भन्नाट मनोरंजन होण्यासाठी 'इच्छाधारी नागीण' ही मालिका सर्वांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची झलक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

'झी मराठी'ने शेअर केलेल्या व्हिडीओमधून 'इच्छाधारी नागीण' (Icchadhari Nagin) मालिकेचा थ्रिलर पाहायला मिळत आहे. तसेच पहिल्या झलकनेच महाराष्ट्राला वेड लावले आहे. या व्हिडीओमधील VFXने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र अद्यापही या मालिकेची तारीख, वेळ जाहीर करण्यात आली नाही आहे. तसेच कोण कलाकार या मालिकेत असतील हे देखील सध्या स्पष्ट झाले नाही आहे.

प्रेक्षक 'इच्छाधारी नागीण' नक्की कोण असेल हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. प्रोमोच्या व्हिडीओमध्ये अंधारी रात्र, खळखळ पाणी, त्यातून बाहेर येणारे नाग आणि शंकराची भव्य मूर्ती या सर्वांनी प्रेक्षकांचे वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तसेच या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अजितदादा-लांडगेंच्या वादात; देवेंद्र फडणवीसांकडून महेश लांडगेंची पाठराखण

Parenting Tips: सावधान! तुम्ही तुमच्या लहान मुलांसमोर कपडे बदलता का? वाईट सवय तर लावत नाहीत ना?

Mini Goa Travel: मुंबई–पुण्याच्या जवळचं मिनी गोवा कधी पाहिलंय का? नसेल तर विकेंड ट्रीप लगेचच करा प्लान

Face Care: चेहरा सॉफ्ट आणि ग्लोईंग हवाय? रात्री झोपताना लावा 5 मिनिटात तयार होणारी होममेड पेस्ट

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? तर 'या' ५ व्यक्तींवर कधीच विश्वास ठेऊ नका, नाहीतर होईल नुकसान

SCROLL FOR NEXT