Zee Chitra Gaurav 2025: Saam tv
मनोरंजन बातम्या

Zee Chitra Gaurav 2025: चिमुकल्या जिनिलियाने केली रितेशची फजिती; तर, अमेय वाघला दिले खास पार्टीच आमंत्रण

Zee Chitra Gaurav 2025: ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा २०२५’ या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे चिमुकल्या जिनिलीयाचा व्हिडीओ.

Shruti Vilas Kadam

Zee Chitra Gaurav 2025 : ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा २०२५’ येत्या ८ मार्चला रात्री ७ वाजता प्रसारित होणार आहे. यंदा ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यातील सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख आणि अमेय वाघकडे देण्यात आली आहे. सोशल मीडियावर या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे चिमुकल्या जिनिलीयाचा व्हिडीओ.

झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’च्या सोहळ्यात सातारच्या जिनिलीयाची खास एन्ट्री होणार आहे. या जिनिलीयाने सगळ्यांचं लक्ष वेधल आहे. मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात जिनिलीया देशमुख मराठमोळ्या लूकमध्ये दिसली होती. तोच लूक करून सातारची जिनिलीया ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात उपस्थित राहणार आहे.

ही सातारची जिनिलीया दुसरी कोण नसून बालकलाकार वेदांती भोसले आहे. वेदांती जिनिलीयासारखी हुबेहूब लूक करून रितेश देशमुखसाठी खास उखाणा घेताना आणि डान्स करताना दिसणार आहे. याचा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये सातारची चिमुकली जिनिलीया रितेशला म्हणतेय की, तुम्ही मोठी जिनिलीया मिळाली, म्हणून या छोट्याश्या जिनिलीयाला विसरलात का? त्यानंतर अमेय विचारतो, “तुम्ही पण जिनिलीया देशमुख आहात का?” तर वेदांती म्हणते, “होय. मी सातारची जिनिलीया. तुम्ही या सातारला. मस्त रानात मटणाची पार्टी करू.” तेव्हा रितेश म्हणतो की, मी मटण खात नाही. नंतर छोटी जिनिलीया म्हणते, “तुमच्यासाठी पिझ्झाची पार्टी आणि उसाचा रस.” त्यावर अमेय वाघ म्हणतो, “जिनिलीयाजी हे सगळं तुम्हीच ठरवलं.” यावर छोटी जिनिलीया म्हणते, “जिनिलीया कुठलीही असो. सगळं तिचं ठरवते. हो ना रितेश सर?” हे ऐकताच सोहळ्यात सगळे हसू लागतात. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून आता चाहत्यांना या ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT