Sonakshi Sinha And zaheer iqbal: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. अलिकडेच, अभिनेत्रीने तिची अबू धाबी ब्लॉगची पोस्ट शेअर केली. या पोस्टमधली फोटो खूप चर्चेत आले. या कपलचे रील अनेकदा व्हायरल होतात. चाहते त्यांच्या लाडक्या लव्हबर्ड्सवर प्रेमाचा वर्षाव करतात आणि त्यांच्या जोडीचे कौतुक करतात.
अभिनेत्रीने अबू धाबीमधील मशिदीला भेट दिली
तिच्या नवीन व्हिडिओमध्ये, सोनाक्षीने पहिल्यांदाच मशिदीला भेट दिल्याबद्दल तिचा उत्साह व्यक्त केला, परंतु झहीरच्या टिप्पणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा ब्लॉग सुरू करताना सोनाक्षी म्हणाली, "आज आम्ही अबू धाबीमध्ये आहोत आणि ही सहल थोडी वेगळी असणार आहे. अबू धाबी टुरिझमने आम्हाला शहराचे सौंदर्य पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे आणि त्यांनी आमच्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे."
झहीरच्या टिप्पणीने लोकांना हसवले
सोनाक्षी पुढे म्हणाली, "मी खूप उत्साहित आहे कारण ही माझी मशिदीत जाण्याची पहिलीच वेळ आहे. मी मंदिरात, चर्चमध्ये गेली आहे, पण कधीही मशिदीत गेलेली नाही." सोना हे सांगताच झहीरने लगेच स्पष्ट केले, "मी तिला धर्मांतर करण्यासाठी तिथे घेऊन जात नाहीये. आम्ही फक्त तिथे जाणार आहोत कारण ती खूप सुंदर जागा आहे. यानंतर चाहते झहीरच्या विनोदी टिप्पणीबद्दल त्याचे कौतुक करत आहेत.
चाहते झहीरचे कौतुक करत आहेत
एका नेटकऱ्याने लिहिले, "झहीरने ट्रोलर्सची बोलती बंद केली. आणखी एकाने लिहीले, खऱ्या सोनाला तिच्या आयुष्यात खरा सोना सापडले आहे, झहीर." दुसऱ्याने लिहिले, "मला तिचा नवरा खूप आवडतो. तो खूप मजेदार आहे." सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी २३ जून २०२४ रोजी लग्न केले. हे कपल जवळजवळ सात वर्षांपासून डेटिंग करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.