Manoj Bajpayee On Mahesh Bhatt Instagram @bajpayee.manoj
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee: महेश भट्टचा एक शब्द अन् मनोज वायपेयीने मुंबई सोडण्याचा निर्णयच बदलला; नेमकं काय घडलं?

Manoj Bajpayee On Struggle: स्ट्रगलच्या दिवसांमध्ये मनोज वाजपेयीच्या हाती काम नसल्यामुळे तो निराश होऊन मुंबई सोडण्याच्या तयारीत होता. त्यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट भेटले होते.

Chetan Bodke

Manoj Bajpayee On Mahesh Bhatt

कोंकणा सेन आणि मनोज वाजपेयी सध्या ‘किलर सुप’ या वेबसीरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. ही वेबसीरीज गेल्या काही दिवसांपूर्वी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. सध्या या वेबसीरीजमधील स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच अभिनेता मनोज वाजपेयीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आपल्या जुन्या दिवसांबद्दल भाष्य केले आहे.

आपल्या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये मनोज हाती काम नसल्यामुळे निराश होऊन मुंबई सोडण्याच्या तयारीत होता. त्यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट भेटले होते. या भेटीमध्ये त्यांनी मनोजला आत्मविश्वास दिला होता. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली, “१९९५च्या काळामध्ये मी कामाच्या शोधात होतो. त्यावेळी अनेक ठिकाणी काम करून सुद्धा माझ्या हातात काम नव्हते. आणि सोबत तेव्हा माझ्या हातात फारसे पैसे सुद्धा नव्हते. त्याचवेळी मला 'स्वाभिमान' मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसकडून मालिकेसाठी फोन आला होता. पण मला टेलिव्हिजन सिरीयल्समध्ये काम करायचे नव्हते.”

अभिनेता आपल्या मुलाखतीमध्ये सांगतो, “कारण, जर मी मालिकेमध्ये काम केलं तर, मी एक चांगला अभिनेता होऊ शकणार नव्हतो. मी जर टिव्ही सिरियलमध्ये काम केले तर मी भ्रष्ट होईल, असं मला वाटायचं. म्हणून मी मुंबई शहर सोडून जाण्याच्याही तयारीत होतो. त्याचवेळी मला ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट भेटले होते. त्यावेळी त्यांनी मला मुंबई शहर सोडून न जाण्याचा सल्ला दिला होता. तुझी सर्व स्वप्न याच शहरामध्ये पूर्ण होतील, असा आत्मविश्वास त्यांनी मला दिला होता. फक्त स्वत:वर विश्वास ठेव. मला तुझ्यामध्ये भावी नसीरूद्दीन शाह यांचा चेहरा दिसतोय.”

मुलाखतीच्या शेवटी मनोज वाजपेयींनी सांगितले की, “मला 'स्वाभिमान' मालिकेमध्ये काम करायचे नव्हते. पण मला माझ्या एका मित्रानेच त्या मालिकेमध्ये काम करण्याची खूप जबरदस्ती केली. त्याने मला मालिकेमध्ये काम कर, असा खूप तगादा लावला होता. शेवटी मी त्या मालिकेमध्ये काम करण्यासाठी होकार दर्शवला. मात्र, आता त्या मालिकेत काम करण्याचा निर्णय कायमच योग्य मानतो.” मनोज बाजपेयीने 'स्वाभिमान' मालिकेतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? आत्ताच हा यशाचा मंत्र लक्षात ठेवा

Thane : आई की, हैवान? ठाण्यातील महिलेचा लेकीला अमानुष मारहाण करतानाचा Video Viral

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadhi Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

SCROLL FOR NEXT