Yo Yo Honey Singh Spotted With Nushrat Bharucha holding each other's hand  Saam TV
मनोरंजन बातम्या

Yo Yo Honey Singh Dating: नुसरत भरूचा करतेय यो यो हनी सिंगला डेट? हातात हात घालून फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल

Yo Yo Honey Singh In Love Again: नुसरत भरूचा आणि गायक-रॅपर यो यो हनी सिंग डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत.

Pooja Dange

Viral Video Of Yo Yo Honey Singh - Nusrat Baruchcha: अभिनेत्री नुसरत भरुचा आणि सिंगर हनी सिंह यांनी एका म्युजिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे. या म्युजिक व्हिडिओमधील त्यांची केमेस्ट्री कमाल होती. त्या दोघांना अनेक इव्हेंटमध्ये सोबत पाहिले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून दोघे एकत्र स्पॉट होत असतात. एकदा चाहत्यांनी दोघांना घेरलं असताना हनी सिंग नुसरतला प्रोटेक्ट करताना दिसला.

नुसरत भरूचा आणि गायक-रॅपर यो यो हनी सिंग यांच्या बॉडी लॅंग्वेजवरून दोघे डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात हनी सिंग आणि नुसरत एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसले.

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नुसरत भरुच्चाने तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगितले. अभिनेत्रीने सांगितले की, तिच्या आयुष्यातील ही पहिली डेटिंग अफवा आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ती इतक्या ठिकाणी राहिली आहे, पण अशी अफवा पसरलेली नाही. शिवाय, ती कोणाशीही रिलेशनशिपमध्ये नसल्यामुळे, असे कधीच झाले नाही. या अफवेमुळे नुसरत खूप आनंदी आहे. तिला कोणाला तरी डेट करत आहे ही अफवा असल्याचे ती सांगू शकते, म्हणूनती खुश आहे. (Latest Entertainment News)

अभिनेत्री पुढे म्हणाली की तिला अशा बातम्यांबद्दल कोणतीही अडचण नाही. कारण या बातम्यांचा तिच्यावर खरोखर परिणाम होत नाही. तिच्या मते, लोकांना आयुष्यात काम नसते आणि त्यामुळे ते असा विचार करत असतात.

'ETimes' ला दिलेल्या मुलाखतीत, तिने आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल 2' चा भाग न होण्याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली, 'तुम्ही एखादा चित्रपट करता ज्याला चांगला प्रतिसाद मिळतो, तेव्हा तुम्ही त्याच्याशी जोडले जाता. ड्रीम गर्लचा नेहमीच एक खास सहवास राहिला आहे.

तसेच, आयुष्मानसोबत काम करणे खरोखरच आनंददायी होते आणि त्याला मी बॉलिवूडमधील माझा सर्वात जवळचा मित्र मानते. जेव्हा मी आजारी पडले होते. मला चक्कर येत होती तेव्हा तोच मला भेटायला आला होता.'

सध्या ती तिच्या आगामी 'छत्रपती' या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT