sara ali khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

प्रेम केलं आणि धोका मिळाला.. २०२० मधल्या वाईट प्रसंगांवर Sara Ali Khan चं स्पष्ट मत, फॅन्स म्हणाले...

साराने नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत.

Chetan Bodke

Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने 'केदारनाथ' आणि 'सिम्बा' या दोन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण केले. परंतू एन्ट्री केल्यानंतर चित्रपटाला मिळालेले उत्तम यश फार काळ काही टिकले नाही. 'लव्ह आज कल' आणि 'कुली नंबर 1' या चित्रपटामुळे साराला फ्लॉप चित्रपटाचा बराच फटका बसला. तो फटका इतका बसला की, तिच्या साठी तो फार वाईट काळ ठरला. त्यावेळी तिच्या आयुष्यात बरेच वाईट प्रसंग आले होते. साराने अलीकडेच तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन 'लव्ह आज कल'च्या शूटिंगदरम्यान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोघांनीही त्या प्रकरणावर आपले स्पष्ट मत दिले नसले, तरी करणने त्याच्या शोमध्ये त्यांचा ब्रेकअप झाल्याचे सांगितले होते. 2020 मध्ये त्या दोघांनी ही ब्रेकअप केला असून ते गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत बोलत नसल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे.

साराने एका पॉडकास्ट शोमध्ये सांगितले की, '2020 हे वर्ष माझ्यासाठी फारच वाईट होते. ब्रेकअपसोबतच माझे अनेक चित्रपट फ्लॉप झाल्याने माझ्यासाठी ते वर्ष फार वाईट होते. अनेकदा त्याच्या चर्चा सोशल मीडियावरही होत होत्या. 'लव्ह आज कल'ची खराब कामगिरी होत असलेल्या ट्रोलिंगचा इतका माझ्यावर परिणाम झाला नाही.'

सारा म्हणाली, 'मी ट्रोलिंग आणि सोशल मीडियाला जास्त महत्त्व देत नाही. सारा अली खानचे हे विधान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या निर्दोष शैलीचे चाहते कौतुक करत आहेत.'

सारा अली खान तिच्या आगामी 'गॅसलाइट', 'ए वतन मेरे' आणि 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सारा अली खान अखेरची अक्षय कुमार आणि धनुषसोबत अतरंगी रे या चित्रपटात दिसली होती. जे डायरेक्ट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Tuesday: मनासारखा जोडीदार मिळणार; 5 राशींचे निर्णय ठरतील अयशस्वी, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

मोठी बातमी! कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

Mumbai Building Fire : मुंबईत ७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग

दारूसाठी पैसे दिले नाही; मुलगा आईवर भडकला, रागात हादरवणारं कृत्य केलं

SCROLL FOR NEXT