Tunisha Sharma Suicide Case: शीझानची तब्बल ७० दिवसांनी तुरुंगातून सुटका, कुटुंबाचा आनंद गगनात मावेना...

टुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शीजान खानची आज म्हणजेच ५ मार्च २०२३ रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
tunisha Sharma
tunisha SharmaSaam Tv

Tunisha Sharma Suicide Case: 21 वर्षीय टेलिव्हिजन अभिनेत्री टुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अलिबाबा:दास्तान-ए-काबुल'च्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तिचा बॉयफ्रेंड शीझान खानवर टुनिषाच्या परिवाराने आरोप केले होते. अभिनेत्रीच्या आईने शीझानच्या विरोधात तक्रार दाखल करच त्याला 25 डिसेंबरला अटक केली होती. या प्रकरणी शीझानला ठाणे सेंट्रल जेलने जामिन मंजुर केला आहे.

tunisha Sharma
Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा प्रकरणाला नवं वळण; मृत्यूआधी शिझानच्या रुममध्ये गेलेली तुनिषा...

टुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शीजान खानची आज म्हणजेच ५ मार्च २०२३ रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. त्याच्या बहिणी फलक नाझ आणि शफाक नाझ तुरुंगाबाहेर त्याच्या भेटीला आले होते. यावेळी त्याच्या बहिणी त्याला नेण्यासाठी तुरुंगाबाहेर दिसल्या. तब्बल 70 दिवसांनी शीझान बाहेर आल्यानं त्याच्या बहिणीही भावुक झालेल्या दिसल्या. तर त्याच्या आईला अश्रूं अनावर झाले.

सर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर 4 मार्च 2023 रोजी वसई न्यायालयाने २८ वर्षीय शीझानचा जामीन अर्ज स्वीकारला. पण, एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शीझानला ठाणे मध्यवर्ती न्यायालयाने जामिन मंजुर केला. यासोबतच त्याचा जामीन अर्ज स्वीकारताना अनेक अटीही घालण्यात आल्या होत्या. देश सोडून जाऊ नये म्हणून त्याचा पासपोर्टही सरेंडर करण्यात आला आहे. याशिवाय पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.

'अलिबाबा:दास्तान-ए-काबुल' या मालिकेत शीझान आणि टुनिषा प्रमुख भूमिकेत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, आत्महत्येच्या १५ दिवसांपूर्वी शीझानने टुनिषासोबत ब्रेकअप केले होते. अभिनेत्रीच्या आईने दावा केला आहे की शीझानने टुनिषाची फसवणूक केली होती, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. अनेकवेळा तिला पॅनिक अटॅकही आला होता. परंतु, शीझानने ब्रेकअप केल्याचे कबुल केले असून धोका दिल्याचा आरोप धुडकावला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com