Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा प्रकरणाला नवं वळण; मृत्यूआधी शिझानच्या रुममध्ये गेलेली तुनिषा...

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.
Tunisha Sharma And Sheezan Khan
Tunisha Sharma And Sheezan Khan Instagram @_tunisha.sharma_

Tunisha Sharma Case Court Hearing: टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणात तिच्या काकांनी शीझानच्या कुटुंबावर मोठा आरोप केला आहे. तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी पोलिसांना शीझान खानच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याची विनंती केली आहे. तुनिषा शर्माने गेल्या महिन्यात २४ डिसेंबर रोजी 'अलिबाबा- दास्तान-ए-काबुल'च्या सेटवर आत्महत्या केली. 25 डिसेंबर रोजी सहकलाकार शीझान खानला अटक करण्यात आली होती.

Tunisha Sharma And Sheezan Khan
Shah Rukh Khan: शाहरुखने बाल्कनीत जाण्यामागील गुपित उलगडलं, वडिलधाऱ्यांनी दिलेली 'ही' शिकवण विसरला नाही...

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने, योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आज केला. या प्रकरणात स्टेशन डायरी आणि इतर पुरावे घेऊन तपास अधिकारी कोर्टात हजर झाले होते.

यावेळी तिच्या मृत्यूच्या आधी घडलेल्या घटनेसंबंधीत सुनावणी पार पडली. तुनिषा ही शिजान खानच्या रूमच्या आत जात असताना नार्मल होती, मात्र जेव्हा ती बाहेर आली तेव्हा अपसेट होती, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात देत सीसीटीव्ही सादर करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

Tunisha Sharma And Sheezan Khan
Pathaan Box-Office Collection: 'पठान' लवकरच १००० कोटी करणार पार, याआधी कोणत्या चित्रपटांनी केली अशी दमदार कमाई

या प्रकरणात भादंवि कलम 164 अन्वये जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्याचबरोबर आरोपी शिझान खान, तुनिषा आणि एका अन्य मित्राचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात आला आहे. सध्या तरी फॉरेन्सिक रिपोर्ट येणं बाकी आहे. मात्र या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

शिझान आणि तुनिषा यांच्यातील नातेसंबंध डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तुटले होते. मृत्यूच्या काही महिन्यांआधीही तुनिषा शर्माला अस्वस्थ वाटत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री 2018 मध्ये देखील नैराश्येशी झुंज देत होती. तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणात शिझान खान तुरुंगात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com