Toxic Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Toxic Collection : रक्षाबंधनाला यशच्या 'टॉक्सिक'ने तिकिट खिडकीवर मारली बाजी, तब्बल 'इतक्या' कोटींची बंपर कमाई

Yash-Toxic Worldwide Collection : यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाने तीन दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'टॉक्सिक' २६ ऑगस्टला रिलीज

'टॉक्सिक'ची २०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

यश अन् कियाराचा चित्रपट रक्षाबंधनला हाऊसफुल

साऊथ सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात बॉक्स ऑफिल हादरवले आहे. 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' (Toxic: A Fairy Tale for Grown-ups) हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी बक्कळ कमाई केली आहे. रक्षाबंधनाला 'टॉक्सिक' हाऊसफुल पाहायला मिळाला. 'टॉक्सिक' ने अवघ्या तीन दिवसांत भारतातील नेट कमाईचा १५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

'टॉक्सिक' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'टॉक्सिक' चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भारतात अंदाजे २६.६० कोटी रुपयांची नेट कमाई केली. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३७.६५ कोटी रुपये कमावले होते. तीन दिवसांत 'टॉक्सिक'ने भारतात १६५.३५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे, तर त्याची एकूण देशांतर्गत ग्रॉस एकूण कमाई १९७.७० कोटी रुपये इतकी झाली आहे. या चित्रपटाने परदेशातही २३.७५ कोटी रुपयांची कमाई केली असून, त्यामुळे त्याची जागतिक स्तरावरील एकूण कमाई २२१.४५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

  • दिवस १ - १०१.१० कोटी रुपये

  • दिवस २ - ३७.६५ कोटी रुपये

  • दिवस ३ - २६.६० कोटी रुपये

मीडिया रिपोर्टनुसार, 'टॉक्सिक'ने तिसऱ्या दिवशी परदेशात ४ कोटी रुपयांची कमाई केली. याचे परदेशातील ग्रॉस कलेक्शन २३.७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. चित्रपटाचे जागतिक स्तरावरील एकूण संकलन आता २२१.४५ कोटी रुपये झाले आहे.'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' मध्ये मुख्य स्टारकास्टमध्ये यश, नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि हुमा कुरेशी यांचा समावेश आहे.

'टॉक्सिक' चित्रपटाचे भाषांनुसार कमाई

चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईमध्ये हिंदी आवृत्तीचा वाटा सर्वात मोठा राहिला, अंदाजे १९.१५ कोटी रुपयांची कमाई केली. कन्नड आवृत्तीने एकूण ५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तेलुगू आवृत्तीने अंदाजे १.५० कोटी रुपये कमावले. तमिळ आवृत्तीने ७५ लाख रुपयांची कमाई केली. मल्याळम आवृत्तीने २० लाख रुपये कमावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Rooms Safety Tips: हॉटेलच्या रूममध्ये कुठे असतात छुपे कॅमेरे? बुकिंग करण्यापूर्वी तपासा या 4 महत्त्वाच्या जागा

Maharashtra News Live Update: प्रदीप पुणेकर हत्या प्रकरणी महाविकास आघाडीचा उद्या ठाण्यात मोर्चा

Hair Care: केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका?

GST Council Meeting: अटकेची तरतूद रद्द! रिफंड, क्रेडिट लिमिटसह GST मध्ये १० मोठे बदल

मुंबई-पुणे फक्त ४८ मिनिटांत, दिल्ली-वाराणसी अवघ्या ४ तासांत...; १६ लाख कोटी...भारतीय रेल्वेनं बघितलेलं 'बुलेट' स्वप्न सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT