मनोरंजन बातम्या

Prayag Raj Passes Away: अमिताभ बच्चन, रजनीकांत यांचे चित्रपट लिहिणारा लेखक हरपला; दिग्दर्शक आणि अभिनेते प्रयाग राज यांचे निधन

Bollywood Writer: अमिताभ बच्चन यांचे चित्रपट लिहिणाऱ्या या लेखकाने शनिवारी जगाचा निरोप घेतला आहे.

Pooja Dange

Amitabh Bachchan, Rajinikanth Film Writer Died at 88:

प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रयाग राज यांचे निधन झाले आहे. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट लिहिणाऱ्या या लेखकाने शनिवारी जगाचा निरोप घेतला.

प्रयाग राज यांना लोक 'याहू' या नावाने देखील ओळखायचे. त्यांनी ६०च्या दशकात 'जंगली'चित्रपटातील गाण्याला आवाज दिला होता. त्या गाण्यातील 'याहू' हा शब्द खूप लोकप्रिय झाला.

प्रयाग राज यांचे वय ८८ वर्ष होते. गेल्या ८-१० वर्षांपासुन हृदयविकार आणि वयोमानासंबंधित आजाराने ग्रासले होते. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, आज शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रयाग राज यांनी फक्त चित्रपटांचे लेखनच केले नाही तर अभिनय देखील केला. प्रयाग राज यांनी अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. प्रयाग राज यांनी लेखक, दिग्दर्शकासह संगीतकार म्हणून देखील काम केले आहे.

प्रयाग राज यांच्या करिअरची सुरुवात १९६३ साली आलेल्या 'फुल बने अंगारे' या चित्रपटापासून झाली. त्यांचा शेवटचा चित्रपटात दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. राजेश खन्ना यांचा 'सच्चा झूठ' हा चित्रपट त्यांच्या करियरमधील पहिला सुपरहिट चित्रपट होता.

प्रयाग राज यांनी अमिताभ बच्चनच्या अमर अकबर अँथनी, 'कुली', 'नसीब', 'मर्द' यासह अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. तसेच अभिनेता म्हणून त्यांनी 'कॉन मैरी', 'प्रतीक्षा', 'माय लव्ह', 'द गुरु', 'जब जब फूल खिले', 'आवारा' आणि 'आग' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT