Neetu Kapoor's Special Post For Rishi Kapoor: ‘काही कथा कधीच संपत नाहीत...’ ऋषी कपूर यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त नितू कपूर यांची भावुक पोस्ट...

ऋषी कपूर यांचे चाहते आणि फिल्म इंडस्ट्री सोशल मीडियावर ऋषी कपूर यांच्या स्मृतींना उजाळा देत असून नीतू कपूर यांनी ही एक फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला.
Neetu Kapoor's Special Post For Rishi Kapoor
Neetu Kapoor's Special Post For Rishi KapoorInstagram

Rishi Kapoor Death Anniversary: दिवंगत बॉलिवूड सेलिब्रिटी ऋषी कपूर जरीही आज आपल्यात नसले तरी, ते आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आहेत. ऋषी कपूर एक बॉलिवूड सेलिब्रिटी, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध होते. ऋषी कपूर यांची उणीव आजही संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रिला भासते. दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचा आज तिसरा स्मृती दिन आहे. ऋषी कपूर यांचे चाहते आणि फिल्म इंडस्ट्री सोशल मीडियावर ऋषी कपूर यांच्या स्मृतींना उजाळा देत असून नीतू कपूर यांनी ही एक फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला. (Bollywood Actor)

Neetu Kapoor's Special Post For Rishi Kapoor
Rishi Kapoor's Death Anniversary: लहानग्या ऋषी कपूरने चित्रपटामध्ये काम करावं यासाठी नर्गिसने दाखवलं या गोष्टीचं आमिष

ऋषी कपूर दिलखुलासपणे आयुष्य जगणारा माणूस म्हणून कायम सर्वांच्याच स्मरणात आहेत.बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून सर्वत्र फेमस असणाऱ्या अभिनेत्याला आपल्या सिनेकारकिर्दित अनेक पुरस्कारांनी गौरवले होते. ऋषी कपूर यांना चार फिल्मफेअर पुरस्कार आणि एका राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेले अनेक वर्ष ऋषी कपूर कर्करोगाशी झुंज देत होते. ३० एप्रिल २०२० रोजी त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने त्याने प्राणज्योत मालवली. (Entertainment News)

Neetu Kapoor's Special Post For Rishi Kapoor
Neetu Kapoor's Special Post For Rishi KapoorInstagram

नुकतेच ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्नी नीतू कपूर यांनी एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋषी कपूर, नीतू कपूर, मोठी मुलगी रिद्धिमा कपूर, रिद्धिमाची मुलगी आणि मुलगा रणबीर कपूर दिसत आहेत. नीतू कपूरने शेअर केलेला हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. नीतू कपूर अनेकदा चाहत्यांसोबत फॅमिली फोटो शेअर करत असतात. त्यावर चाहते देखील भरभरून प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com