विंक म्युझिक या डाऊनलोड्स व दैनंदिन सक्रिय युजर्सच्या आकडेवारीनुसार भारतातील पहिल्या क्रमांकाच्या म्युझिक स्ट्रीमिंग अॅपने नुकतेच विंक रिवाइण्ड २०२३ चे अनावरण केले. याअंतर्गत यंदा भारतीय संगीतक्षेत्रात प्रभुत्व गाजवलेले अव्वल कलाकार, अल्बम्स व गाण्यांची घोषणा करण्यात आली.
लोकप्रिय मराठी पार्श्वगायिका सोनाली सोनावणे विंक म्युझिकवर मराठी भाषेतील मोस्ट स्ट्रीम आर्टिस्ट ठरली आहे. मराठी चित्रपट 'सरला एक कोटी'मधील गाणे 'केवड्याचं पान तू' प्लॅटफॉर्मच्या मोस्ट स्ट्रीम मराठी गाण्यांच्या यादीमध्ये अव्वलस्थानी आहे. ज्यानंतर संजू राठोड यांचे गाणे 'नऊवारी'चा क्रमांक आहे. 'रेडिओ टॉप २० मराठी', 'वाजती टाळ मृदुंग' आणि 'एव्हरग्रीन मराठी रोमँटिक हिट्स' या २०२३ मधील मोस्ट-स्ट्रीम मराठी प्लेलिस्ट्स आहेत.
यंदाचे रिवाइण्ड अद्वितीय होते, जसे म्युझिकल झोडेक, इंटरअॅक्टिव्ह अॅक्टिव्हीटी बॅज, जे चाहत्यांच्या सहभागावर देखरेख ठेवण्यासह अनेक चाहते असलेल्या कलाकारांना प्रकाशझोतात आणण्यात आले. विंकच्या श्रोत्यांना त्यांच्या टॉप गाण्यांच्या वैयक्तिक प्लेलिस्टचा आनंद मिळण्यासोबत त्यांच्या आवडत्या कलाकाराकडून स्पेशल व्हिडिओ मेसेज देखील मिळाला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
स्वावलंबी कलाकारांसाठी भारतातील सर्वात मोठी म्युझिक डिस्ट्रीब्युशन इकोसिस्टम विंक स्टुडिओचा १३०० हून अधिक प्रबळ आर्टिस्ट समुदाय आहे. यापैकी ५५ टक्के कलाकार ईशान्येकडील शहरांसह नॉन-मेट्रोपोलिटन भागांमधील आहेत. यामधून या क्रिएटर्सना सर्जनशील अभिव्यक्तीसाठी माध्यम प्रदान करत आणि उत्पन्न व दृश्यमानतेसह त्यांच्या आव्हानांचे निराकरण करत सक्षम करण्यामधी बनवण्यासाठी विंक म्युझिक भूमिका दिसून येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.