Vicky Kaushal in YRF Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal: टायगर आणि पठाणसोबत विकी कौशलची यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये एन्ट्री? साकारणार 'ही' खास भूमिका

Vicky Kaushal in YRF: यशराज स्पाय युनिव्हर्सचे चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत आणि हिट फ्रँचायझी पैकी एक आहेत. आता लवकरच विकी कौशलची या स्पाय युनिव्हर्समध्ये एन्ट्री होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Vicky Kaushal in YRF: यशराज स्पाय युनिव्हर्सचे चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत आणि हिट फ्रँचायझी पैकी एक आहेत. या चित्रपटांनी आतापर्यंत सलमान खानची 'टायगर', शाहरुख खानची 'पठाण' आणि हृतिक रोशनची 'कबीर' सारख्या दमदार भूमिका प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे आणि आता या युनिव्हर्समध्ये आणखी एका अभिनेत्याच्या प्रवेशाची बातमी आहे. माहितीनुसार लवकरच, विकी कौशल या स्पाय युनिव्हर्सचा भाग होणार आहे.

विकी कौशल अॅक्शन हिरो बनणार आहे. माहितीनुसार, यशराज फिल्म्सच्या पुढील स्पाय थ्रिलर चित्रपटात विकी कौशल लीड हिरो म्हणून दिसू शकतो. मिड डेच्या वृत्तानुसार, "या प्रकल्पाबद्दल काही काळापासून चर्चा सुरू आहे. विकी या फ्रँचायझीचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट आणि इतर तपशील अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहेत, परंतु यामुळे यशराज स्पाय युनिव्हर्समध्ये एक नवीन पात्र जोडले जाणार आहे."

'छावा' सारख्या हिट चित्रपटानंतर, विकी कौशलची स्टार व्हॅल्यू खूप वाढली आहे. निर्मात्यांचा असा विश्वास आहे की त्याच्याकडे एका मजबूत गुप्तहेर व्यक्तिरेखेला सांभाळण्याची क्षमता आहे. या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी सुरू होऊ शकते आणि येत्या काळात त्याच्या दिग्दर्शकाचे नाव जाहीर केले जाईल. तसेच, आतापर्यंत या गुप्तहेर विश्वात एकूण ७ चित्रपट बनले आहेत, ज्यात हृतिक रोशनचा 'वॉर २' आणि आलिया भट्टचा 'अल्फा' यांचा समावेश आहे आणि आता विकी कौशलचा नवीन चित्रपट एन्ट्री करणार आहे.

विकी काळापूर्वी 'छावा' या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील विकीच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. येत्या YRF च्या आगामी चित्रपटात विकी कोणती भूमिका साकारणार हे पुढचे काही महिन्यांनी स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT