Prateik Smita Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prateik Smita Patil: प्रतीकने वडिल राज बब्बर यांना लग्नाला का नाही बोलावले? कारण सांगत म्हणाला, आई स्मिता पाटील...

Prateik Smita Patil and Raj Babbar: बॉलिवूड अभिनेता प्रतीक स्मिता पाटील याने 14 फेब्रुवारी 2025 रोजी अभिनेत्री प्रिया बॅनर्जी सोबत विवाह केला. पण, या लग्नात वडील राज बब्बर आणि त्यांच्या कुटुंबाला आमंत्रित केल नव्हत.

Shruti Vilas Kadam

Prateik Smita Patil and Raj Babbar: बॉलिवूड अभिनेता प्रतीक स्मिता पाटील याने 14 फेब्रुवारी 2025 रोजी अभिनेत्री प्रिया बॅनर्जी सोबत विवाह केला. हा समारंभ त्यांच्या दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या घरात आयोजित केली गेली होती. या खासगी समारंभात वडील राज बब्बर आणि त्यांच्या कुटुंबाला आमंत्रित न केल्यामुळे चर्चांना उधाण आले.

प्रतीकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, त्याची आई स्मिता पाटील आणि वडील राज बब्बर यांच्या पत्नी नादिरा बब्बर यांच्यातील नातेसंबंध ठिक नव्हते. यामुळे, आईच्या घरात वडील आणि त्यांच्या कुटुंबाला आमंत्रित करणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटले नाही. त्याने सांगितले की, "माझ्या वडिलांची पत्नी आणि माझ्या आईमध्ये पूर्वी संबंध चांगले नव्हते. म्हणून त्या घरात त्यांना आमंत्रित करणे योग्य ठरणार नाही."

प्रतीकने हेही स्पष्ट केले की, हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक मतभेदामुळे नव्हता. तो म्हणाले, "हे कोणाला नाकारण्याबद्दल नव्हते, तर माझ्या आईच्या इच्छांचा सन्मान करण्यासाठी होत." तो पुढे म्हणाले की, "माझ्या वडिलांना आणि त्यांच्या कुटुंबाला दुसऱ्या समारंभासाठी आमंत्रित करण्याचा मी विचार केला होता, पण परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली."

या निर्णयामुळे बब्बर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. प्रतीक यांच्या सावत्र बहिणी जूही बब्बर यांनी सांगितले की, "प्रतीक सध्या काही लोकांमुळे आमच्यापासून लांब आहे." तेव्ही, तिने हेही नमूद केले की, "प्रिया एक चांगली मुलगी आहे आणि आम्ही प्रार्थना करतो की प्रतीक आनंदी राहावा."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Puranpoli: शेंगदाणा पुरणपोळी कशी बनवायची? स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी जाणून घ्या

Maharashtra Live News Update: सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या समर्थनात आंदोलन

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' तारखेपासून लागू होणार आठवा वेतन आयोग; समोर आली मोठी अपडेट

Mansi Naik : मानसी नाईकबद्दल या ५ गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Mobile Recharge: कमी बजेट? तरीही मिळणार 5G इंटरनेट, Vi चा 'हा' प्लॅन तुमच्यासाठी आहे परफेक्ट

SCROLL FOR NEXT