Tv Serials News Updates, Why are TV series called Daily Soap? Saam Tv
मनोरंजन बातम्या

टीव्ही मालिकांना 'डेली सोप' का म्हणतात? त्यांचा साबणाशी काय संबंध?

टीव्हीवर येणाऱ्या मालिकांना डेली सोप (Daily Soap) म्हणतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की मालिकांना डेली सोप का म्हणतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीव्हीवर येणाऱ्या मालिकांना डेली सोप (Daily Soap) म्हणतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की मालिकांना डेली सोप का म्हणतात? खरेतर याचा संबंध युरोप (Europe) सोबत आहे. हो! 19 व्या शतकाच्या अंती कामाच्या शोधात युरोपचे लोक अमेरिकेत (America) जाऊ लागले होते. जगभरात युरोपचे तापमान सर्वात थंड मानले जाते. यामुळे अमेरिकेत पोहोचणारे प्रवासी युरोपियन लोकांमध्ये आंघोळीची (Bathing) सवय कमी होती. त्यांची हीच गोष्ट अमेरिकन लोकांना आवडत नव्हती. येथूनच डेली सोप शब्दाची सुरुवात झाली. परंतु टीव्ही मालिकांसोबत (Television Episodes) याचा संबंध कसाकाय आला जाणून घेऊयात. (Why are TV series called 'Daily Soap'?)

त्या काळी युरोपीय लोकांना स्वच्छतेचे महत्व सांगण्यासाठी अमेरिकेच्या लोकांना खूप मेहनत करावी लागत होती. देशात यांच्यासाठी स्वच्छता अभियान चालवण्यात आले होते जेणेकरून हे लोक स्वतःला स्वच्छ ठेवतील. न्यूयॉर्क (New York) शहरात सार्वजानिक स्नानगृह बनवण्यात आले होते. अनेक कंपन्यांना सोबत घेऊन हे मोहीम राबवण्यात आले होते. तथापि, केवळ उपायांनी काम झाले नाही म्हणून नंतर रेडिओचा अवलंब केला गेला.

20व्या शतकात रेडिओचा वाढता युग होता. त्यात अश्या मालिका प्रसिद्ध करण्यात आल्या ज्यामध्ये स्वच्छतेचे महत्व शिकवण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून साबणाच्या वापरावर जोर देण्यात आला होता. यामध्ये स्वतःचा फायदा लक्षात घेत हळू हळू साबण बनविणाऱ्या कंपन्या निधी (Funds) देऊ लागल्या. यामध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) सारख्या कंपन्यांचा समावेश होता. हळूहळू अशा कार्यक्रमांना डेली सोप म्हटले जाऊ लागले.

टीव्हीच्या सुरुवातीच्या काळातही असे कार्यक्रम रोज दाखवण्यात येत होते ज्यामुळे युरोपिअन लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्व जागरूक व्हावे. त्यानंतर त्यांची जागा मालिकांनी घेतली, पण त्यांना देखील डेली सोप म्हटले जाऊ लागले. हळूहळू हा शब्द जगभर प्रसिद्ध झाला. अशा प्रकारे या मालिकांना डेली सोप्स असे नाव देण्यात आले.

भारतात देखील डेली सोप हा शब्द खूप लोकप्रिय आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या मालिकांना उच्च स्तरावर पोहोचवणारी बालाजी टेलिफिल्म्सच्या व्यवस्थापकीय संचालक एकता कपूरला डेली सोप क्वीन असेही म्हटले जाते. यांचे कार्यक्रम पाकिस्तानमध्ये देखील खूप लोकप्रिय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT