बॉक्स ऑफिसवर KGF चाप्टर २ 'यश'स्वी ; तीन दिवसांत तब्बल १४० कोटींची कमाई

KGF Chapter 2
KGF Chapter 2Saam Tv
Published On

एकेकाळी बॉलिवूडच्या सिनेमांचा (Bollywood movie) सिनेविश्वात इतका दबदबा होता की, सिनेमा प्रदर्शीत झाल्यावर सिनेचाहत्यांची चित्रपटगृहात जायला प्रचंड लगबग असायची. आताही चाहत्यांना बॉलिवूडचे सिनेमे पाहणं आवडतंच. पण, गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमांनी (Tollywood) जी भरारी घेतली आहे, त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. दिग्दर्शक राजामौली यांनी २०१५ ला बाहुबली प्रदर्शीत केला आणि सिनेमा जगभरात गाजला. त्यानंतर दाक्षिणात्य सिनेमांचाही जागतिक स्तरावर बोलबाला होऊ लागला. त्यानंतर बाहुबली २, केजीएफ, तसंच यावर्षी प्रदर्शीत झालेले पुष्पा, आरआरआर सिनेमानं चाहत्यांची मने जिंकली. मात्र, १४ एप्रिलला दिग्दर्शक प्रशांत नील (Prashant Nil) यांनी केजीएफ चाप्टर २ प्रदर्थीत केला अन् सिनेचाहत्यांना या सिनेमाचं वेडंच लागलं. होय, हे खरं आहे. कारण बॉक्स ऑफिसवर KGF चाप्टर २ ने इतका धुमाकूळ घातला आहे की, तीन दिवसांत बड्या सिनेमांचे विक्रम मोडीत काढून तब्बल १४० कोटी रुपयांची कमाई केलीय. अशी माहिती बॉक्स ऑफिस इंडियानं (box office India) दिलीय. दरम्यान, KGF2 चार दिवसांत १८० कोटींचा गल्ला जमवणार असाही अंदाज बांधला जातोय. सिनेमा चित्रपट गृहात सुपरहीट होण्यामागे अनेक संपूर्ण केजीएफ २ सिनेमाच्या (KGF chapter 2) टीमचं मोलाचं योगदान आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत असणारा सुपरस्टार यश, तसंच संजय दत्त, रविना टंडन यांनी केलेल्या भूमिकेला प्रेक्षाकांची वाहवा मिळत आहे.

'KGF2' ला युनायटेड स्टेटमध्येही उत्तम प्रतिसाद

रमेश बाला यांनी दिलेल्या रिपोर्ट्सनुसार. केजीएफ चाप्टर २ या सिनेमानं यूएसमध्ये ३ मिलियन डॉलर म्हणजेच २३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. केजीएफची तर ही सुरुवात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात हा सिनेमा किती कोटींचा गल्ला गाठतो आणि कोण-कोणते विक्रम मोडीत काढतो. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसंच दाक्षिणात्या भागातही सिनेमा गाजला असून चांगली कमाई करत आहे. एस. एस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमानंही जगभरातून तब्बल १००० कोटी रुपयांवर कमाई केलीय. कोट्यावधी रुपयांची कमाई करणारा आरआरआर सिनेमा देशातील तिसरा सिनेमा ठरला आहे. त्यामुळे बॉक्सऑफिसवर आता केजीएफ २ ची मजल कुठपर्यंत जाते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

KGF Chapter 2
माझ्या मुलाने माझा 'तसला' Video पाहिला मग...; अभिनेत्री किमने सांगितला किस्सा

KGF 2 बनवण्याचा प्लॅन नव्हता

सिनेमाचे दिग्ददर्शक प्रशांत नील यांनी एका मुलाखती दरम्यान असं म्हटलंय की, केजीएफ ला दोन चाप्टर मध्ये करण्याच विचार केला नव्हता. त्यावेळी बजेटची समस्या होती. परंतु, केजीएफ चाप्टर टू ची वाढत्या मागणीनुसार, आम्ही सिनेमाच्या बजेटचं विचार करणं सोडलं आणि एका मोठ्या स्केलवर ग्रॅंड कॅनवासवर सिनेमा बनवण्याचं ठरवलं. या सिनेमाला हॉलिवूड सिनेमाचा दर्जा मिळण्यासाठी आम्ही सर्वांनी काबाडकष्ट केले. केजीएफ चाप्टर २ प्रदर्शीत झाल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या जबदरदस्त प्रतिसादामुंळ आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आहे.

संजय दत्त आणि रविना टंडनबाबत शंका होती

केजीएफ 2 च्या कास्टींगची खूप चर्चा होती. सिनेमामध्ये संजय दत्त आणि रविना टंडनही मुख्य भूमिकेत आहेत. यावर बोलताना दिग्दर्शक प्रशांत म्हणतात, मोठ्या स्टार्सला कास्ट करताना मला शंका होती. हिंदी फिल्म इंडस्ट्रीबाबत मला खूप सारं माहिती आहे. पण जेव्हा आम्ही रविना टंडन आणि संजय दत्त यांना कास्ट केलं त्यावेळी मला शंका होती की, आमच्यासोबत काम करताना त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळेल याची काही कल्पन नव्हती. आम्ही सेटवर वेळेला खूप महत्व देतो. त्यामुळे ते दोघे सेटवर वेळेवर येतील की नाही, याबाबतही साशंकता होती. पण ते खूपच प्रोफेशनल आहेत. अशा कलाकारांसोबत मी पहिल्यांदाज काम केलंय. पहिला सिनेमा सुपरहीट झाला होता. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मी काहीतरी चांगलचं करेन. त्यांनी स्क्रीप्टवर विश्वास ठेवला आणि सिनेमात उत्तम अभिनय केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com