Rakhi Sawant  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: राखीचा आधार गेला; आधी वडील आता आईच्या निधनाने राखी पडली एकटी, कोण-कोण आहे कुटुंबात?

राखीची आई जया यांनी आनंद सावंत यांच्याशी पुनर्विवाह केला होता. ते मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात हवालदार होते.

Chetan Bodke

Rakhi Sawant: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत यांचं निधन झालं आहे. जया सावंत या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखीचा पती आदिल दुर्रानीने जया यांच्या निधनाची बातमी दिली होती. आईच्या निधनाने राखी सावंतवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून राखी नऊ लाख रुपये घेऊन बाहेर पडली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिने आपल्या आईची भेट घेतली होती. तेव्हापासून ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत आईच्या तब्येतीची माहिती शेअर करत आली आहे.

राखी सावंत बिग बॉस 15 मध्ये आली तेव्हा तिच्या आईचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले होते. 2021 मध्ये झालेल्या हे ऑपरेशनही यशस्वी झाले होते. यात खुद्द सलमान खान आणि सोहेल खाननेही मदत केली होती. पण 2023 मध्ये तिच्या आईला ब्रेन ट्युमरचे निदान झाले होते.

राखी सावंतचे खरे नाव नीरू भेडा आहे. तिची आई जया यांनी आनंद सावंत यांच्याशी पुनर्विवाह केला होता. ते मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात हवालदार होते. अभिनेत्रीने त्यांच्याकडूनच सावंत हे आडनाव घेतले आहेत.

राखी सावंतचे वडील आनंद सावंत यांचा कोणताही फोटो नाही, मात्र 2012 मध्ये चालत्या ट्रेनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे राखीने सांगितले होते. त्यावेळी ते कर्तव्यावर होते. राखीला एक भाऊ आणि बहिण आहे. भावाचे नाव राकेश सावंत असून तो चित्रपट दिग्दर्शक आहे. आणि बहिण उषा सावंत असून ती देखील अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध आहे. हे कोणीच आता पर्यंत तिच्यासोबत दिसले नाहीत.

राखी सावंतने 2019 मध्ये NRI रितेशसोबत लग्न केल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर 2022 मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. राखी सावंतने जुलै 2022 मध्ये आदिल खान दुर्राणीसोबत कोर्ट मॅरेज केले होते. 2023 मध्ये त्याचे पुरावेही सादर करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पन्नास हजार मताच्या फरकाने निवडून येणार-माधुरी मिसाळ

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT