Anurag Kashyap On Bollywood: 'सस्ती कॉपी...', अनुराग कश्यपचा पुन्हा बॉलिवूडवर निशाणा

अनुराग कश्यप यांनी दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांच्या आरआरआर चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.
Anurag Kashyap
Anurag KashyapSaam Tv
Published On

Anurag Kashyap Spoke About Indian Cinema: चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक अनुराग कश्यप वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनुराग कश्यपने बॉलिवूड चित्रपटांवर पुन्हा एकदा टीका करत वादळ तोंड फोडले आहे. बॉलिवूड चित्रपट कॉपी असल्याचे अनुह म्हणले आहेत.

अनुराग कश्यप यांना प्रश्न विचारण्यात आला की, जगभरातील प्रेक्षकांच्या भारतीय सिनेमाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात काही बदल झाला आहे का..? यावर अनुराग म्हणाला की, 'कोणत्याही प्रकारची मौलिकता, जी त्याच्यासाठी मूळ आहे, त्यांना प्रभावित करते..' अनुरागने असेही सांगितले की, मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांनी 'ओरिजिनल चित्रपट बनविणे बंद केले आहे...'

Anurag Kashyap
Pathan Craze In France: भारतासह परदेशात रंगली 'पठान'ची चर्चा, शाहरुख खान झाला फ्रान्सच्या टीव्हीवर हिट

एका मुलाखतीदरम्यान अनुराग कश्यप यांनी दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांच्या आरआरआर चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. या चित्रपटातील 'नाटु नाटु' या गाण्याविषयी बोलताना अनुराग म्हणाले, असे गाणे बनविणे 'अविश्वसनीय' कठीण आहे. राजामौली यांचे कौतुक करत अनुराग म्हणाले, अशी गाणी बनविण्यासाठी नजरिया, हिंमत आणि स्टीलच्या नसांची गरज आहे.

अनुराग पुढे म्हणाले की, 'मला भारतीय चित्रपट खूप आवडतात, परंतु त्यांना एकाच प्रकारचे चित्रपट आवडतात. एक वेळ होती जेव्हा भारतीय चित्रपट जगभरात प्रदर्शित व्हायचे, आवरा, डिस्को डान्सर, जिमी जिमी ही गाणी सगळेजण जायचे. तुम्ही आफ्रिकेत जा, तुम्ही अरब देशांमध्ये जा, भारतात मुख्य प्रवाहातील चित्रपटांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. कुठेतरी आमच्या मुख्य प्रवाहात, आम्ही मूळ होणे बंद केले आहे. आमचे मुख्य प्रवाहातील चित्रपट आता हॉलीवूडच्या अ‍ॅक्शन चित्रपटांच्या स्वस्त प्रती (सस्ती कॉपी) बनत आहेत.'

दाक्षिणात्य चित्रपटांविषयी बोलताना अनुराग म्हणले, 'दाक्षिणात्य चित्रपट अजूनही जमिनीवर आहेत, ते अजूनही भारतीय चित्रपटांसारखे दिसतात. बरच हिंदी चित्रपट भारतीय चित्रपटांसारखे दिसतच नाहीत. त्यांना भारतात शूट देखील केले गेले नाही. हे चित्रपट भारताविषयी देखील नाहीत. हेच कारण आहे की आरआरआर चित्रपटाने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि परदेशात सुद्धा हिट ठरली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com