Who Is Swanandi Tikekaer Boyfreind Saam Tv
मनोरंजन बातम्या

Who Is Swanandi Tikekaer Boyfreind: स्वानंदी टीकेकरच्या प्रेमात पडलेला आशिष कुलकर्णी नेमका आहे तरी कोण?

Who Is Ashish Kulkarni: स्वानंदीच्या बॉयफ्रेंडचे नाव आशिष कुलकर्णी असून या दोघांमध्ये पहिले चांगली मैत्री होती. त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झाले.

Chetan Bodke

Ashish Kulkarni And Swanandi Tikekar Love Story: टेलिव्हिजन सिरीयल्समधून प्रकाशझोतात आलेली स्वानंदी टिकेकर सध्या कमालीची चर्चेत आहे. स्वानंदीने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बॉयफ्रेंड आशिष कुलकर्णीसोबत रोमँटिक फोटो शेअर करत ‘आमच्या दोघांचं ठरलंय’ अशी कॅप्शन देत नात्याबद्दलची माहिती दिली आहे. सध्या या दोघांच्याही नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून चाहत्यांनी स्वानंदीला बॉयफ्रेंड आशिषबद्दल काही प्रश्न विचारलेत.

स्वानंदीबद्दल बोलयाचे तर, ती एक उत्तम अभिनेत्री असून उत्तम सुत्रसंचालिका आणि उत्तम गायिका देखील आहे. बालपणापासूनच आईकडून गाण्याचे बाळकडू मिळाल्यामुळे ती देखील गाणे उत्तम गाते.

स्वानंदी आतापर्यंत काही मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झाली आहे. त्यातील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ आणि ‘अगं अगं सुनबाई?, काय म्हणता सासूबाई’ या मालिकेतून ती एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली.

खरं तर, स्वानंदीला खरी ओळख ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या माध्यमातूनच प्राप्त झाली. स्वानंदी सिनेअभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लेक आहे.

स्वानंदीच्या बॉयफ्रेंडचे नाव आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) असून या दोघांमध्ये पहिले चांगली मैत्री होती. त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झाले. लवकरच येत्या काही दिवसांमध्ये ही जोडी लग्नाच्या बोहल्यावर चढणार असून गेल्या २० जुलैला स्वानंदीने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला. आशिष सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध गायक असून त्याचे सातासमुद्रापार गाण्यांचे कार्यक्रम देखील होत असतात.

Indian Idol 12 मधून आशिषला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली असून तो मुळचा पुणेरी आहे. आशिषचं स्वत:चं युट्यूब चॅनल असून तो त्यावर त्याचे अनेक गाणे देखील शेअर करत असतो. Indian Idol 12 मधून आशिषला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. त्या मंचावरील आशिषचे अनेक गाणे चाहत्यांच्या पसंदीस उतरले होते. त्या गाण्यांवर आशिषच्या जगभरातील चाहत्यांनी त्याला तुफान प्रतिसाद दिला आहे. आशिष एक गीतकार असून त्याने अनेक हिंदी गाण्यांसोबत मराठी गाणे देखील गायले आहेत.

स्वानंदी- आशिषच्या प्रेमाचे सुत नेमके कसे जुळले?, या दोघांचे ही सुत कुठे जुळले? हे त्यांनी स्पष्ट केले नसून लवकरच ही जोडी साखरपुडा देखील करणार आहे. काल सायंकाळी उशिरा स्वानंदीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तिच्या हातावरील मेहेंदी रंगलेली दिसते.

बॉयफ्रेंड आशिष तिच्या गालावर किस करताना दिसत असून त्यांचा हा रोमँटिक फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालाय. या फोटोखाली स्वानंदीने #EngagementMehendi #SwanandiAshish असा हॅशटॅग वापरलाय. हा फोटो पाहून स्वानंदीने आशिष सोबत गुपचुप साखरपुडा उरकलाय का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT