Johnny Lever On Aamir Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

Johnny Lever On Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा आमिर खान अनेकदा आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकतो. लोकांना आमिरचा अभिनय खूप आवडतो. आज आमिरचा 'कयामत से कयामत तक' चित्रपट प्रदर्शित होऊन 36 वर्षे झाली आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Johnny Lever On Aamir Khan:

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा आमिर खान अनेकदा आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकतो. लोकांना आमिरचा अभिनय खूप आवडतो. आज आमिरचा 'कयामत से कयामत तक' चित्रपट प्रदर्शित होऊन 36 वर्षे झाली आहेत.

या खास प्रसंगी प्रत्येकजण आमिरचे अभिनंदन करत आहे. पण याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता जॉनी लीव्हर म्हणाला आहे की, आमिर खान कोण आहे? नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊ...

जॉनीने केलं आमिरचे कौतुक

अलीकडेच bollywoodnow ने जॉनीच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जॉनी आमिरबद्दल बोलत आहे आणि त्याचे कौतुक करत आहे. व्हिडीओमध्ये जॉनी सांगत आहे, आमिर खान आला, तेव्हा आम्ही विचारलं आमिर खान कोण आहे?

जॉनी म्हणाला, आम्ही भेटलो आणि आम्ही चित्रपटाबद्दल बोलू लागलो. त्यावेळी आम्ही म्हणालो होतो की, चित्रपट चालत नाही. मात्र 'कयामत से कयामत तक' हा त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा आमिर खान… बाप रे बाप… त्यात त्याने खूप चांगला अभिनय केला.

जॉनी म्हणाला की, ''आमिर इतका नॅच्युरल वागला की, तो एक सामान्य माणूस आहे, असं वाटलं. आमिरचा अभिनय पाहून लोकांना वाटले की, हो यार, तो हे पूर्णपणे नॅच्युरल अभिनय करतो. यामुळेच तो सुपर-डुपर हिट होता. त्याचबरोबर आता चाहतेही आमिरचे खूप कौतुक करत आहेत. आमिर खानच्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटात जुही चावला, दलीप ताहिल, इम्रान खान, राजेंद्रनाथ जुत्शी, गोगा कपूर आणि इतर अनेक कलाकार दिसले होते. लोकांना हा चित्रपट खूप आवडला.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Kautarkhana Rada: दादर कबुतरखान्याजवळ जोरदार राडा, पोलिसांकडून मराठी आंदोलकांना मारहाण; धरपकड सुरू, पाहा VIDEO

Santosh Juvekar: ट्रोलिंगनंतरही संतोष जुवेकर पुन्हा बरळला; म्हणाला- "मी तिकडे बघितलंच नाही, बघूच शकलो नाही..."

Office gossip: 'या' ४ गोष्टी कधी ऑफिसमधील जवळच्या मित्रालाही सांगू नका; कारणं वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Tejashri Pradhan: वीण दोघांतली ही तुटेना मालिकेतील स्वानंदीचं वय किती?

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये मेट्रो स्टेशन परिसरात मनपाच्या धावत्या बसमध्ये शॉटसर्किटमुळे आग, प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT