Shahid Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor: बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयने चाहत्यांना दिला फिटनेस फंडा, दिल्या 'या' खास हेल्थ टिप्स...

नुकतेच एका हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शाहिदने त्याचा फिटनेस फंडा दिला आहे.

Chetan Bodke

Happy Birthday Shahid Kapoor: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण यावेळी तो त्याच्या वाढदिवसामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. २५ फेब्रुवारीला अर्थात आज शाहिद कपूर आपला ४२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्याने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या आरोग्याविषयी भाष्य केले आहे.

शाहिद कपूरने आता पर्यंत बॉलिवूडला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. त्यातील त्याच्या उत्तम शरीरयष्टीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नुकतेच एका हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शाहिदने त्याचा फिटनेस फंडा दिला आहे. " मी शुद्ध शाकाहारी आहे. मला कोणत्याच अमली पदार्थांचे व्यसन नाही. मी पूर्वी सिगारेट ओढायचो पण मी ती खूप वर्षांपूर्वी सोडली होती. मी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नेहमीच वेळेवर झोपतो आणि व्यवस्थित व्यायाम करतो."

सोबतच तो पुढे म्हणतो, "मी नेहमीच मला आनंदित ठेवणाऱ्या गोष्टी करतो. त्यामुळे ते करताना माझ्या चेहऱ्यावर एक वेगळेच सुख असते. आवडत्या गोष्टी करताना मला नेहमीच आनंद मिळतो. या मुळे मी नेहमीच तंदुरुस्त राहतो. मी 20 वर्षांचा असताना एक पुस्तक वाचले होते. ते वाचून मी शाकाहारी व्हायचं ठरवलं."

शाहिद पुढे म्हणतो, " मी २०१५ मध्ये मीरा राजपुतसोबत लग्न गाठ बांधली होती. मला कधी कधी माझी पत्नीही त्रास द्यायची. पण आता पत्नी कमी त्रास देते आणि मुलं जास्त त्रास देतात. त्यांच्या सोबत सर्वाधिक वेळ घालवल्याने मला काम करण्याचा एक वेगळाच उत्साह मिळतो. मला मिशा आणि झैन असे दोन मुलं आहेत."

शाहिद कपूरने विजय सेतुपतीसोबत 'फर्जी' या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याने या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

Ind vs Eng Test : इंग्लंडला मोठा धक्का; बेन स्टोक्ससह हुकमी गोलंदाज ओव्हल कसोटीतून बाहेर, प्लेइंग ११ मध्ये ४ बदल

SCROLL FOR NEXT