Javed Akhtar: 'इथे नाही घाबरत तर त्यांच्या देशात...' जावेद अख्तरांनी पाकिस्तानातील 'त्या' विधानावरुन सोडले मौन
Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांच्या विरोधात वक्तव्य केले आहे, तेव्हापासून ते बरेच चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या त्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मी दिलेली प्रतिक्रिया फारच चर्चेत आहे, मला आता त्या गोष्टीचीच लाज वाटायला लागली आहे. माझ्या अंदाजे मला आता पाकिस्तानात पुन्हा पाऊल ठेवून दिले जाणार नाही.' जेव्हा जावेद अख्तर यांना तुम्हाला या प्रकरणाची भिती वाटते का? असे विचारले होते. तेव्हा ' मी त्यांना इथे घाबरत नाही, तर तिकडे जाऊन काय घाबरायचं' अशी प्रतिक्रिया दिली.
जावेद अख्तर यांनी अलीकडेच लाहोरमध्ये लेखक फैज अहमद फैज यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात जावेद अख्तर म्हणतात, भारतीयांना वाटते की सर्व पाकिस्तानी दहशतवादी आहेत. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत आहेत. या विधानानंतर जावेद बरेच चर्चेत आहेत. तर दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये त्याच विधानामुळे खळबळ उडाली आहे. आता पाकिस्तानी कलाकार त्यांच्यावर जोरदार टीका करत आहे, तर भारतात त्यांची खूप प्रशंसा केली जात आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी त्या घटनेचा पुन:रुच्चार करत म्हणाले, 'माझे विधान खूपच वादग्रस्त झाले आहे, लज्जास्पद वाटते, असे वाटते की मी अशा कार्यक्रमांसाठी जाऊ नये. मी जेव्हा भारतात आलो तेव्हा, मला तिसरं महायुद्ध जिंकून आल्याची भावना वाटू लागली होती. सध्या माझ्या त्या मुद्द्याची सर्वत्र बरीच चर्चा होत आहे.
लाहोरमध्ये झालेल्या कार्यक्रमात हॉल संपूर्ण भरलेला होता. त्यावेळी ते विधान करताना तुमच्या मनात कसली भिती होती का ? या प्रश्नावर जावेद अख्तर म्हणतात, 'ज्या देशात आपण जन्मलो, जिथे वाढलो तिथेच मरण पावणार आहे. काही दिवसांसाठी दुसऱ्या देशात जाण्याची कसली भिती? जर आपण त्यांना इथे घाबरत नाही, तर तिथे जाऊन त्यांना काय घाबरायचं?' अशा प्रकारे गीतकार जावेद अख्तर नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.