Bhagya Dile Tu Mala Update: लग्नाला नक्की यायचं!, अखेर पार पडणार राज-कावेरीच्या विवाहसोहळा

दोन तासाचा विशेष भागात कावेरी आणि राजवर्धन यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.
Weeding Ceremony of Raj and Kaveri
Weeding Ceremony of Raj and Kaveri Saam TV
Published On

Special Episode Of Bhagya Dile Ti Mala: बॉलिवूड कलाकार असो किंवा मराठी कलाकार, सगळीकडे लग्नाचे वारे वाहत आहेत. आता हे वारे टीव्ही मालिकांपर्यंत देखील पोचले आहेत. आता तुम्ही म्हणाल ते कसं, जरा थांबा सगळं सांगतो.

कोणाच्याही आयुष्यात लग्न हा सर्वात महत्वाचा क्षण असतो आणि हाच क्षण आता राज आणि कावेरीच्या आयुष्यात येणार आहे. या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. ज्या क्षणाची वाट राज कावेरीसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता.

Weeding Ceremony of Raj and Kaveri
Prajakta Mali Love: प्राजक्ता माळीवर मुलंच नाही तर मुलीही फिदा; 'ही' अभिनेत्री आहे तिच्या प्रेमात

राज कावेरीच्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि हे दोघे कधी एकत्र येणार याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना होती. एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन एकेमकांना समोर आले आंणि दोघांमध्ये हळुवार प्रेम फुलत गेले.

कावेरी आणि राजवर्धनच्या या गोष्टीमध्ये अनेक अनपेक्षित वळण आली. अखेर तो शुभ दिवस आला आहे. २६ फेब्रुवारीला दु. १ आणि संध्या ७ वा. दोन तासाचा विशेष भागात कावेरी आणि राजवर्धन यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे. नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा साज तुम्हाला दिसणार आहे. लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पर पडणार आहेत. खऱ्या अर्थाने राजला कावेरीची साता जन्मासाठी साथ मिळणार आहे.

रत्नमाला म्हणजेच निवेदिता सराफ यानिमित्ताने म्हणाल्या, "रत्नमालासाठी तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे कारण याच दिवसाची वाट ती बघत होती. कारण कावेरीच्या आयुष्यात येण्याने राजमध्ये खूप बदल झाले आहेत. मालिकेत रत्नमाला आणि राजचं नातं देखील दृढ झाले आहे. आता मालिकेत राज कावेरीचं लग्न होणार आहे.

सेटवर अगदी आनंदी वातावरण आहे, जय्य्त तयारी सुरु झाली आहे. मोहितेंचे घर सकारात्मकतेने, आपल्या माणसांनी, नातेवाईकांनी बहरून जाणार आहे. जितका आनंद आम्हांला आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला आहे कारण ते देखील या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. तेव्हा राज - कावेरीच्या लग्नाला नक्की यायचं हे आमच्याकडून सगळयांना आग्रहाचे निमंत्रण आहे”.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com