IPL 2023 Opening Ceremony Saam Tv
मनोरंजन बातम्या

IPL 2023: IPL 2023 चं ग्रँड ओपनिंग... टायगरपासून कतरीनापर्यंत अनेक सेलिब्रिटी सोहळ्याची रंगत वाढवणार

आयपीएल २०२३ ची सुरुवात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीममध्ये ३१ मार्च रोजी या आयपीएल हंगामातील पहिला सामना होणार आहे.

Chetan Bodke

IPL 2023 Opening Ceremony:  येत्या शुक्रवारपासून आयपीएलची दणकेबाज सुरूवात होणार आहे. आयपीएल २०२३ ची सुरुवात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीममध्ये ३१ मार्च रोजी या आयपीएल हंगामातील पहिला सामना होणार आहे. हार्दिक पांड्याकडे गुजरातच्या कॅप्टन पदाची जबाबदारी मिळाली असून, चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच असणार आहे.

आयपीएलच्या या सोळाव्या सीझनमधला पहिला सामना शुक्रवारी, ३१ मार्च रोजी खेळवला जाईल आणि त्या सामन्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आयपीएलच्या या सीझनमधील ग्रँड ओपनिंग सोहळाही मोठ्या दणक्यात पार पडणार आहे. आयपीएल 2023 च्या ग्रँड ओपनिंगची आणि पहिल्या सामन्याची माहिती जाणून घेऊया...

IPL 2023 चा ग्रँड ओपनिंग 31 मार्च, शुक्रवारी पहिला सामना सुरू होण्यापूर्वी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये कोणते स्टार्स परफॉर्म करणार आहेत याबाबत निश्चित माहिती नाही, पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटिया परफॉर्म करण्याची शक्यता आहे.

सोबतच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ, टायगर श्रॉफ आणि अर्जित सिंग आयपीएल 2023 च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करू शकतात. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

IPL 2023 चा पहिला सामना हार्दिक पंड्याचा गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळा IPL चॅम्पियन धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

हा सामना शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 2 सामने झाले आहेत.

गेल्या सीझनमध्ये गुजरातने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते, तर चेन्नई सुपर किंग्जने गुणतालिकेत 10 पैकी 9वे स्थान पटकावले होते. आता या हंगामाची सुरुवात कशी होते हे पाहावे लागेल.

यावेळी गुजरात टायटन्स या संघात, हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विल्यमसन, जोशुआ लिटल, ओडियन स्मिथ, उर्विल पटेल, के.एस. भरत आणि मोहित शर्मा हे खेळाडू खेळणार आहेत.

तर चेन्नई सुपर किंग्ज या संघात, एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापती, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोईन अली, राजवर्धन हंगेरगेकर, शिवम दुबे, दीपक चहर, महेश थिकशन, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथिशा पाथीराना, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन आणि अजय मंडल हे खेळाडू खेळणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT