MP Jaya Bachchan Has Shared Her Opinion: 'द बिग बँग थिअरी' हा शो सध्या भारतात चर्चेत आहे. 2007 मध्ये आलेल्या अमेरिकन टेलिव्हिजन शो 'द बिग बँग थिअरी'मुळे गोंधळ निर्माण झाला. या मालिकेच्या एका एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितसाठी अपमानास्पद शब्द वापरण्यात आले आहेत. तसंच तिची ऐश्वर्या रायशी तुलना देखील केली गेली आहे.
माधुरीचे फॅन आणि राजकीय विश्लेषक विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीसही बजावली आहे. आता या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
या मालिकेतील अभिनेता कुणाल नय्यरच्या विधानांबद्दल एका वृत्तसंस्थेशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या, "हा माणूस वेडा आहे का? अतिशय अभद्र भाषा आहे. त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल काय वाटते ते विचारले पाहिजे.”
जया बच्चन व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. या एपिसोडबद्दल मला माहिती नाही, त्यामुळे मी यावर भाष्य करू शकत नाही. असे उर्मिला म्हणाली आहे. तथापि, जर असं म्हटलं असेल तर हा एक अतिशय वाईट मानसिकता आणि विचार आहे.
हा वाद बिग बँग थिअरीच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या भागावरून होत आहे. या भागाच्या एका दृश्यात, जिम पार्सन्सने ऐश्वर्या रायचे वर्णन गरिबांची माधुरी दीक्षित असे केले आहे. ज्यावर अभिनेता कुणाल नय्यर ऐश्वर्याला देवी म्हणतो आणि नंतर तिची तुलना माधुरीशी करतो आणि माधुरीसाठी अपमानास्पद शब्द वापरतो.
बिग बँग थिअरीमध्ये जिम पार्सन्सने शेल्डन कूपरची भूमिका केली होती आणि कुणाल नय्यर यांनी राज कूथरापल्लीची भूमिका केली होती. हा एक कॉमेडी शो आहे. विजय कुमारने नेटफ्लिक्सला पाठवलेल्या नोटीसमध्ये त्यांनी हा सीन हटवण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.