Anushka Shrma and Virat Kohli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Virat Anushka Wedding Anniversary: विरुष्काची पहिली अॅड आणि पहिला गुण पडला महागात, पण आता…

क्रिकेट जगताचं आणि कलाकारांचं प्रेम चाहत्यांना फार काही नवं नाही. खेळाडू आणि अभिनेत्रींचे सुत जुळताना अनेकांनी पाहिले आहे.

Chetan Bodke

Virat Anushka Wedding Anniversary: क्रिकेट जगताचं आणि कलाकारांचं प्रेम चाहत्यांना फार काही नवं नाही. खेळाडू आणि अभिनेत्रींचे सुत जुळताना अनेकांनी पाहिले आहे. क्रिकेटर आणि अभिनेत्री यांच्या जोड्या चर्चेत आहेत, त्यातीलच एक जोडी म्हणजे, विराट कोहली- अनुष्का शर्माची. अनेकदा ही जोडी पापाराझींच्या गऱ्हाळ्यात आलेली आहे. दोघांची पहिली भेट वैगेरे कशी झाली ही माहिती जाणून घ्यायला सर्वचजण कमालीचे उत्सुक असतात.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे दोघेही आपल्या लव्हस्टोरीमुळे नेहमीच चर्चेत असतात. विराट- अनुष्काच्या लेकीचे नाव वामिका असे आहे. त्यांच्या लग्नाला आज (११ डिसेंबर २०१७) रोजी पाच वर्ष पुर्ण झाले आहे.

सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या प्रेमातील ट्वीस्ट आणि लग्नानंतरचे एकमेकांवर असलेले प्रेम याची भरपूर चर्चा सोशल मीडियावर होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अनुष्काने एक मुलाखत दिली होती. त्यावेळी अनुष्काने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला होता.

त्या मुलाखतीदरम्यान अनुष्काने पहिल्या भेटीचा किस्सा शेअर करताना सांगितले, 'विराट लग्नाआधी खुप चांगला मित्र तर होताच पण त्याच्यातील आणि माझ्यातील नाते हे फारच वेगळे होते. आम्ही दोघेही एकमेकांना बऱ्याचदा भेटलो सुद्धा आहे.

एका ब्रॅंडसाठी आम्ही अॅड शूट केली होती, तेव्हा आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो होतो. शुटिंग दरम्यान मी नेहमी त्याच्यासोबत वरचढ राहण्याचा प्रयत्न करायचे, थोड्या अहंकारी पद्धतीनेही मी त्याच्यासोबत वागायचे. कारण मला विराट त्यावेळी बराच गर्विष्ठ वाटला. त्याचा गर्विष्ठ स्वभाव असल्याचा मी अनेकदा ऐकले सुद्धा होते.

सोबतच अनुष्काने पुढे सांगितले, आमची पहिली भेट झाल्यानंतर आमच्यामध्ये ज्या चर्चा सुरु झाल्या तेव्हापासून त्याच्या स्वभावाबद्दल अनेक गुढ समजायला लागले. त्यावेळी तो मला खूप विनोदी आणि हुशार वाटत होता.

विराटने आतापर्यंत अनेक जाहिराती शूट केल्या आहेत पण माझ्यासोबत शुट केलेली जाहिरात आमची पहिली जाहिरात होती. शूटच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्रांना डिनर पार्टीसाठी आमंत्रित केले होते, त्यात मी विराटलाही डिनरला बोलवलं होतं. तेव्हापासूनच आमच्या डेटिंगच्या चर्चेला उधाण आलं होतं.

अनुष्का शर्मा तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर परतणार आहे. लवकरच ती 'छकडा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे. अनुष्का यापूर्वी 2018 मध्ये 'झिरो'चित्रपटात शाहरुखसोबत दिसली होती. नुकतेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'कला' चित्रपटात अनुष्काने छोटी भूमिकाही केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT