Saif Ali Khan stabbed case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan: सैफ अली खान काय लपवतोय? त्या रात्री नेमकं काय घडलं होत, चाहत्यांचा प्रश्न

Saif Ali Khan stabbed case: १६ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर सैफ अली खानने आपला जबाब नोंदवला आहे, परंतु त्याच्या जबाबांवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Shruti Vilas Kadam

Saif Ali Khan: १६ जानेवारी रोजी नेमके काय घडले याचे सत्य फक्त सैफ अली खानलाच माहीत आहे आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही त्या रात्रीचे सत्य पूर्णपणे माहिती आहे. सैफच्या म्हणण्यानुसार, तो, करीना कपूर, त्यांचा मुलगा जहांगीर, नर्स आणि हल्लेखोर त्या रात्री घटनास्थळी उपस्थित होते. इतके लोक होते मग एका आरोपीची ओळख पटवण्यात इतका गोंधळ का? सैफचे प्रकरण अधिकाधिक कॉन्फ़्युजिंग होत चाललं आहे. इअनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पण त्यांची योग्य उत्तर सापडत नाही. प्रत्येक प्रश्नाची दोन किंवा तीन उत्तरे असतात. सैफ अली खाननेही पोलिसांना आपला जबाब दिला आहे, तरीही या प्रकरणाचे गूढ उकलले जात नाही. शेवटी, सैफ त्या रात्रीची कोणती गोष्ट लपवत आहे, ज्यामुळे हे प्रकरण संपत नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

एकीकडे, करीना कपूरने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला, यामध्ये ती तिची बहीण करिश्मा कपूर करीनासोबत असल्याचे स्पष्ट दिसत होते. पण सैफने त्याच्या जबाबात म्हटले आहे की घटनेच्या रात्री करीना त्याच्यासोबत बेडरूममध्ये होती. सैफच्या विधानावरून पहिला प्रश्न असा उद्भवतो की जर करीना तिथे होती तर ती त्याच्यासोबत रुग्णालयात का गेली नाही. सैफने पोलिसांना सांगितले की, हल्लेखोर जहांगीरच्या खोलीत घुसला होता आणि नर्स त्याच्यासोबत जेहच्या खोलीत झोपते. सैफने त्याच्या निवेदनात तैमूरचे नाव घेतले नाही.

सैफ अली खान काहीतरी लपवत आहे का?

पण ऑटो चालक भजन सिंग राणा आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की सैफ अली खान त्याचा मुलगा तैमूरसह रुग्णालयात पोहोचला होता. दरम्यान, एक व्हिडीओही व्हायरल झाला ज्यामध्ये करीना रुग्णालयाबाहेर उभी असलेली आणि खूप अस्वस्थ दिसत होती. सैफच्या घराबाहेर सीसीटीव्ही नव्हते, त्या रात्री गार्ड बेफिकीर होता, कोणालाही आवाज ऐकू आला नाही किंवा आरोपी घरात घुसल्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता. अशा अनेक प्रश्नांमध्ये, सैफच्या प्रकरणाचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.

सैफच्या विधानावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत

जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, सैफ आणि करीनाच्या विधानांमध्ये काही गोष्टी वेगळ्या आढळल्या आहेत. आता मोठा प्रश्न असा आहे की सैफ अली खान काय लपवत आहे. सैफ अली खान त्या रात्रीच्या घटना लपवण्याचा प्रयत्न करत आहे का? सैफ अली खान एक सत्य लपवण्यासाठी वारंवार खोटे बोलत आहे का? असे अनेक प्रश्न सामान्य लोकांच्या मनात घोळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शरीरावर असलेल्या बर्थमार्कमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

SCROLL FOR NEXT