Akshay Kumar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar: अक्षय कुमारने विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट; १२ कोटींपेक्षा जास्त झाला फायदा

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट १२.३८ कोटी रुपयांना विकले. २०१७ मध्ये खरेदी केलेल्या या मालमत्तेवर त्याला कोट्यवधी रुपयांचा नफा मिळाला आहे.

Shruti Vilas Kadam

Akshay Kumar : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण त्याचा आगामी चित्रपट नसून, मुंबईतील त्याच्या लक्झरी फ्लॅटचा व्यवहार आहे. अक्षय कुमारने मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरातील दोन आलिशान फ्लॅट विकले असून, यामुळे त्याला एकूण १२.३८ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही फ्लॅट मुलुंड पश्चिम येथील ओबेरॉय एनिग्मामध्ये आहेत. दोन्ही फ्लॅट टॉवर 'बी'च्या १८व्या मजल्यावर असून प्रत्येक फ्लॅटचे कार्पेट क्षेत्रफळ सुमारे १,८८६ चौरस फूट आहे. प्रत्येक फ्लॅटची विक्री ६.१९ कोटी रुपयांना झाली असून, दोन्ही व्यवहारांची एकत्रित किंमत १२.३८ कोटी रुपये इतकी आहे. या फ्लॅटसोबत प्रत्येकी तीन कार पार्किंगची सुविधाही देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अक्षय कुमारने हे फ्लॅट २०१७ मध्ये सुमारे ९ कोटी रुपयांना खरेदी केले होते. जवळपास नऊ वर्षांनंतर झालेल्या या व्यवहारातून त्याला सुमारे ३.३८ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे.

याआधीही अक्षय कुमारने मुंबईतील इतर प्रोपर्टीचे व्यवहार करून चांगला नफा मिळवला होता. त्यामुळे तो चित्रपटांप्रमाणेच रिअल इस्टेट गुंतवणुकीतही मोठी कमाई करणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. योग्य वेळी गुंतवणूक करून योग्य वेळी विक्री करण्याच्या त्याच्या रणनीतीची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित 'वेलकम टू द जंगल' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. यामध्ये सुनील दत्त, अर्शद वारसी, परेश रावल, रवीना टंडन, दिशा पाटनी यांसारखे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे, पोलिसांना सापडले पुरावे; सिया-चेतन करायचे कोड वर्डने चॅटिंग

केतनच्या हत्येचं बीड कनेक्शन उघड, केतन हत्या प्रकरणात तिसरा कोण?

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT