Ghabadkund Collection: मराठी चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर डंका; 'घबाडकुंड'चा दोन आठवड्यांत ८ कोटींपेक्षा जास्त गल्ला

Ghabadkund Collection: 'घबाडकुंड' चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याअखेर ८.१० कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Ghabadkund Collection
Ghabadkund CollectionSaam tv
Published On

Ghabadkund Collection: मराठी चित्रपटसृष्टीतील रहस्य, थरार आणि भयाचा अनोखा संगम असलेल्या 'घबाडकुंड' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेतही या चित्रपटाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं असून, दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस तब्बल ८.१० कोटी रुपयांची कमाई करत यशाचा नवा टप्पा गाठला आहे.

'राजा शिवाजी', 'तुंबाडची मंजुळा' आणि 'देऊळ बंद' या मराठी चित्रपटांसह बॉलिवूडमधील 'कॉकटेल', 'में वापस आऊंगा', 'वेलकम टू द जंगल' तसेच हॉलिवूडमधील 'द ओडिसी', 'स्पायडर-मॅन' आणि 'ऑब्सेशन' यांसारख्या बहुचर्चित चित्रपटांची स्पर्धा असतानाही 'घबाडकुंड'ने आपल्या वेगळ्या कथानकाच्या आणि उत्कंठावर्धक मांडणीच्या जोरावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे.

Ghabadkund Collection
khashaba: राजकारणातून थेट चित्रपटात...; नेत्यानं साकारली पूजनीय व्यक्तिमत्वाची भूमिका, मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, VIDEO

चित्रपटातील रहस्यपूर्ण कथा, प्रभावी दिग्दर्शन, कलाकारांचा दमदार अभिनय, लक्षवेधी संवाद, पार्श्वसंगीत आणि उत्कृष्ट तांत्रिक बाजू यामुळे प्रेक्षकांकडून चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही 'घबाडकुंड'ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि 'वर्ड ऑफ माऊथ'चा चित्रपटाला मोठा फायदा होताना दिसत आहे.

Ghabadkund Collection
Khashaba Movie: नागराज मंजुळेंचा 'खाशाबा' नवा सिनेमा; परश्या,जब्यानंतर कोण असेल नवा अभिनेता, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदी कलाकारांची दमदार फौज ‘घबाडकुंड’ चित्रपटात आहे. विविध तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवरही चित्रपटाला उत्कृष्ट रेटिंग मिळत असून, त्यामुळे नव्या प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com