khashaba: राजकारणातून थेट चित्रपटात...; नेत्यानं साकारली पूजनीय व्यक्तिमत्वाची भूमिका, मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, VIDEO

khashaba Movie : नागराज मंजुळे यांच्या 'खाशाबा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात संभाजीराजे छत्रपती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
khashaba Movie
khashaba MovieSaam Tv
Published On

khashaba Movie : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतीक्षित 'खाशाबा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारताला स्वतंत्र्यानंतर पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती. ते या चित्रपटात त्यांच्या हृदयाच्या अत्यंत जवळ असलेल्या एका ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. ते या चित्रपटात त्यांचे आजोबा शहाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

khashaba Movie
Khashaba Movie: नागराज मंजुळेंचा 'खाशाबा' नवा सिनेमा; परश्या,जब्यानंतर कोण असेल नवा अभिनेता, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "खाशाबा या चित्रपटात माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या पूजनीय व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असुन १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या संघर्षमयी जीवनचरित्रावरील हा चित्रपट असून यामध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तीमत्वाची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली, याचे मला अत्यंत समाधान आहे. सर्वांनी हा टीजर जास्तीतजास्त प्रसारित करावा व आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी हा चित्रपट अवश्य चित्रपटगृहात जाऊन पाहावा.

khashaba Movie
Shraddha Kapoor: 'ईठा'साठी श्रद्धा कपूरची वाढली डिमांड; बायोपिकसाठी घेतले इतके कोटी?

या चित्रपटात महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, छाया कदम, गार्गी कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, ओम भूतकर यांच्यासह स्वतः नागराज मंजुळे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com