Shruti Vilas Kadam
अभिनेत्री श्रद्धा कपूरने 'ईठा' चित्रपटासाठी सुमारे 15 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. यापूर्वी ती 5 ते 7 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे सांगितले जात होते.
'स्त्री 2'च्या यशानंतर श्रद्धा कपूरचा हा पहिला मोठा चित्रपट असून, तिच्या करिअरमधील महत्त्वाच्या कामांपैकी एक आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला 'ईठा' हा चित्रपट लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे.
श्रद्धा कपूरने या भूमिकेसाठी लावणी, तमाशा आणि ग्रामीण ढंग आत्मसात करण्यासाठी विशेष तयारी केली असून, तिच्या लूक आणि अभिनयाचीही चर्चा सुरू आहे.
'ईठा' या शीर्षकावर विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला असून, चित्रपटाचे नाव 'विठाबाई' ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
चित्रपटाचे निर्माते हा बायोपिक श्रद्धा कपूरच्या कारकिर्दीला नवे वळण देईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत.
'ईठा' हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, श्रद्धा कपूरचा नवा अवतार पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.