Box office collection of mahavatar narsimha saiyaara dhadak 2 son of sardaar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Box Office Collection: 'महावतार नरसिंह' आणि 'सैयारा'मध्ये कांटे की टक्कर; जाणून घ्या 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २'ची कमाई

Box Office Collection Report: बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवल्यानंतर, 'सैयारा' चित्रपटाची कमाई तिसऱ्या आठवड्यात कमी होऊ लागली आहे. पण 'महावतार नरसिंह'ची कमाई झपाट्याने वाढत आहे.

Shruti Vilas Kadam

Box Office Collection: चित्रपटगृहांमध्ये आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 'सैयारा' हा चित्रपट भरपूर कमाई करून ब्लॉकबस्टर ठरला आहे. 'महावतार नरसिंह'ची गोष्ट सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. याशिवाय 'धडक २', 'सन ऑफ सरदार २' आणि 'किंगडम' सारख्या चित्रपटांचे पर्याय देखील प्रेक्षकांकडे आहेत. पण प्रश्न असा आहे की बॉक्स ऑफिसवर सगळ्यात वरचढ चित्रपट कोणता आहे.

सैयारा

मोहित सुरी दिग्दर्शित अहान पांडे आणि अनित पड्डा अभिनीत 'सैयारा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. सुमारे ५०-६० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि जगभरातील कमाई ५०० कोटींच्या पुढे गेली आहे. पण, २० दिवसांनंतर आता त्याची कमाई थोडी कमी होत आहे. मंगळवारी, १९ व्या दिवशी, चित्रपटाने २.५० कोटी रुपये कमावले. तर, काल बुधवारी २० व्या दिवशी, फक्त १.८८ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण भारतातील कलेक्शन ३०६.४८ कोटी रुपये झाले आहे.

महावतार नरसिंह

'महावतार नरसिंह' हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट सध्या थिएटरमध्ये सर्वाधिक कौतुकाचा विषय ठरत आहे. २५ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. मंगळवारी, १२ व्या दिवशी या चित्रपटाने ८.५ कोटी रुपये कमावले. दुसरीकडे, काल, बुधवारी, १३ व्या दिवशी चित्रपटाची कमाई ६ कोटी रुपये होती. या पौराणिक चित्रपटाचे भारतातील कलेक्शन ११२.८० कोटी रुपये झाले आहे. हा चित्रपट अश्विन कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे.

धडक २

म्यूझिकल रोमँटिक प्रेमकथेवर आधारित 'सैयारा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. दुसरीकडे, 'धडक २'ची अवस्था वाईट आहे. हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी 'सन ऑफ सरदार २' सोबत प्रदर्शित झाला. सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी अभिनीत चित्रपटाने मंगळवारी पाचव्या दिवशी १.६५ कोटी रुपये कमावले. शाजिया इक्बाल दिग्दर्शित 'धडक २' ने काल, बुधवारी सहाव्या दिवशी फक्त १ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाचे कलेक्शन १५.४० कोटी रुपये आहे.

सन ऑफ सरदार २

'सन ऑफ सरदार २' चित्रपटाची कमाई दररोज कमी होत आहे. अजय देवगणचा हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. मंगळवारी, पाचव्या दिवशी, या चित्रपटाचे कलेक्शन २.७५ कोटी रुपये होते. तर, काल बुधवारी सहाव्या दिवशी, त्यात आणखी घट झाली आणि कमाई फक्त १.६४ कोटी रुपये होती. या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ३१.४९ कोटी रुपये झाले आहे. हा चित्रपट सुमारे १०० कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : नाद करा, पण आमचा कुठं! भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अभिषेक- गिलने धू धू धुतलं

Laxman Hake: आरक्षणाचा वाद वाढणार; SC मधून 'या' समाजालाही आरक्षण द्या; लक्ष्मण हाकेंची नवी मागणी

India vs Pakistan: फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता सामना; कारण आलं समोर

Sahibzada Farhan Gun Celebration: वाह दुबे जी वा! स्लोअर बॉलवर ढेर अन् म्हणे 'गन' सेलिब्रेशन|Video Viral

Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

SCROLL FOR NEXT