Mohammad Zakir Hussain Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mohammad Zakir Hussain Death: ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ फेम गायकाचे निधन, बिसापूर येथे घेतला अखेरचा श्वास..

Mohammad Zakir Hussain Passes Away: ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ फेम गायक मोहम्मद झाकीर हुसैन यांचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

Voice of India Fame Singer Mohammad Zakir Hussain Dies: संगीत क्षेत्रातून दु:खद बातमी समोर येत आहे. ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ फेम गायक मोहम्मद झाकीर हुसैन यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. छत्तीसगडच्या बिलासपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत जगतासह सर्वत्र शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळी गायक मोहम्मद झाकीर हुसैन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायक मोहम्मद झाकीर हुसैन यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तात्काळ स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशिर झाला होता. मोहम्मद झाकीर हुसैन यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. (Singer)

बिलासपूरच्या पुराणी बस्ती येथील ईदगाह स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे मोहम्मद जाकीर हुसैन आपल्या कुटुंबासोबत बिलासपूरला गेले होते. तेथे असताना अचानक त्यांची प्रकृती अचानक बिघडली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. (Bollywood News)

मोहम्मद झाकीर हुसैन यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या राणी रोड येथील जुन्या निवासस्थानावर नातेवाईक आणि हितचिंतकांनी मोठी गर्दी केली आहे. मोहम्मद झाकीर हुसैन यांच्या आवाजाची जादू चाहत्यांवर कायम होती. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. (Entertainment News)

मोहम्मद झाकीर हुसैन यांना लहानपणापासूनच संगीत आणि कला क्षेत्राची विशेष आवड होती. यामुळेच त्यांनी 'व्हॉईस ऑफ इंडिया'मध्ये आपला झेंडा फडकवला. तेव्हापासून ते छत्तीसगडमधील प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या निधनाची माहिती कळताच संगीत विश्वात तसेच कुटुंबीय आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

SCROLL FOR NEXT