Vivek Agnihotri On Filmfare Award
Vivek Agnihotri On Filmfare Award Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vivek Agnihotri On Filmfare Award: विवेक अग्निहोत्रींना का नकोय फिल्मफेअर?; पुरस्कार मिळण्याआधीची पोस्ट चर्चेत...

Chetan Bodke

Vivek Agnihotri On Filmfare Award: सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती, फिल्मफेअर पुरस्कार २०२३ ची. फिल्मफेअर पुरस्कार २०२३ ची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. आज अर्थात २७ एप्रिल २०२३ ला सायंकाळी हा पुरस्कार सोहळा दणक्यात पार पडणार आहे.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शानदार पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे. कोण या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारणार, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री कोण आणि अनेक प्रश्न सध्या सर्वांना पडले आहे. या वर्षीचा हा पुरस्कार सोहळा देखील पार पडण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. आहे.

२०२३च्या पुरस्कार सोहळ्याला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला तब्बल ७ नामांकनं प्राप्त झाली आहेत. पण इतकं असूनही विवेक अग्निहोत्री यांनी हे पुरस्कार थेट नाकारले आहेत. ट्विट करत विवेक अग्निहोत्री यांनी या पुरस्कारावर बहिष्कार टाकल्याचे म्हंटले आहे. सोबतच 'फिल्मफेअर' वर सडकून टीका देखील केली आहे. काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतात.

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकनाची पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये काश्मीर फाइल्स, गंगूबाई काठियावाडी, ब्रह्मास्त्र, भूल भुलैया 2, बधाई हो आणि ऊंचाई या चित्रपटांचा त्यात समावेश आहे. यासोबतच विवेकने भली मोठी पोस्ट लिहित फिल्म इंडस्ट्रीतील अवॉर्ड फंक्शनवर निशाणा साधला आहे. 

विवेकने लिहिले, “मला मीडियावरून कळले की काश्मीर फाइल्सला ६८ व्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठी ७ श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. पण या अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कारांचा भाग होण्यास मी नम्रपणे नकार देतो.” (Bollywood Film)

पुढे विवेक अग्निहोत्री म्हणतात, “फिल्मफेअरच्या मते, स्टार्सशिवाय इतर कोणीही महत्वाचे नाही. लोकप्रिय चेहऱ्यांशिवाय इतर लोकांचं कुणाला काही पडलेलं नाही. म्हणूनच, फिल्मफेअरच्या  अनैतिक जगात संजय भन्साळी किंवा सूरज बडजात्या सारख्या मास्टर डायरेक्टर्सना महत्व नाही. संजय भन्साळीची ओळख आलिया भट्ट तर सूरज यांची ओळख  मिस्टर बच्चन अशी आहे. हे सुत्र सर्वांनाच माहित आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्सवरुनच चित्रपट निर्मात्यांची प्रतिष्ठा ठरवली जाते, असे नाही पण ही अपमानास्पद व्यवस्था संपली पाहिजे. म्हणून, बॉलिवूडमधील भ्रष्ट, अनैतिक आणि गुंड प्रवृत्तीच्या विरोधात माझा निषेध आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी मी असे पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.” (Bollywood Actor)

सोबतच विवेक अग्निहोत्री पुढे म्हणतात, “मी व्यवस्थेचा किंवा पुरस्कारांचा भाग होण्यास नकार दिला आहे. लेखक, दिग्दर्शक आणि इतर एचओडी आणि चित्रपटातील क्रू मेंबर्स स्टार्सला कमी वागणूक देतात, अशा कोणत्याही भ्रष्ट व्यवस्थेचा किंवा पुरस्कारांचा भाग होण्यास मी कायम नकार देतो.”

विवेकने त्याच्या पोस्टमध्ये शेवटी लिहिले की, “पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि जे पुरस्कार नाही जिंकू शकले त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन.” या पोस्टमध्ये त्यांनी बॉलिवूडची पोलखोल केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Water Crisis: चिंताजनक! मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र; १२ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

Sushma Andhare Helicopter Crash | सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे सुखरूप

Eknath Khadse: सुनबाईसाठी एकनाथ खडसे मैदानात; 'भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याआधीचं केली प्रचाराला सुरूवात!

Water Shortage : मराठवाड्यात तीव्र टंचाई; टँकरची संख्या वाढून पोहचली १४०० च्या वर

Van Hits Children : ट्रकने २९ मुलांना चिरडले, १८ जण गंभीर; कल्चरल फेस्टिवलदरम्यान मोठी दुर्घटना

SCROLL FOR NEXT