Kangana Ranaut Go To Court Against Filmfare Awards:दरवर्षीप्रमाणे या वर्षाचाही फिल्मफेअर कमालीचा चर्चेत आला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२३ यावर्षी देखील मोठ्या दणक्यात पार पडणार आहे. हा पुरस्कार सोहळा आज अर्थात 27 एप्रिल 2023 रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर शानदार पद्धतीने पार पडणार आहे. कोण या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारणार, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री कोण आणि अनेक प्रश्न सध्या सर्वांना पडले आहे. नेहमीप्रमाणे यावर्षातील पुरस्कार सोहळा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा वाद कंगनाने तिच्या हातानेच ओढावलाय.
२०२२ च्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कंगना रणौतला तिच्या थलायवी या चित्रपटातील अभिनयासाठी तिला ६७ व्या फिल्मफेअर पुरस्करात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन मिळालं होतं. पण कंगनाने त्या पुरस्कार सोहळ्यावरच टीका केली आहे. तिने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला 'अनैतिक, भ्रष्ट आणि पूर्णपणे अनुचित प्रथा' असं म्हणत अवॉर्ड शोवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सोबतच यावेळी सुशांत सिंगच्या मृत्यूचे कारण फिल्मफेअर असल्याचा आरोप लगावला आहे.
कंगनाने फिल्मफेअरबद्दल निर्माण केलेल्या गदारोळानंतर, फिल्मफेअरच्या टीमने तिचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन रद्द केले. कंगनाचे आरोप खोटे आहेत असं विधान फिल्मफेअरतर्फे करण्यात आलं होतं. फिल्मफेयरने निवेदनात स्पष्ट केलं की, "फिल्मफेअरबद्दल कंगना रणौतने केलेल्या अवास्तव, बेजबाबदार टिप्पणीमुळे आम्हाला त्रास होत आहे. फिल्मफेअरच्या कार्यकारी संपादकांनी कंगना रणौतला पुरस्कारावेळी सर्वोत्कृष्ट भूमिकेचे नॉमिनेशन दिल्याची माहिती दिली. आमंत्रण पाठवण्यासाठी तिला पत्ता देखील विचारला. " (Entertainment News)
2014 आणि 2015 मध्ये फिल्मफेअर सोहळ्यात उपस्थित नसताना किंवा कार्यक्रमात परफॉर्मन्स न करताही कंगनाला दोनदा फिल्मफेअर पुरस्कार कसा देण्यात आला. कंगनाला 'क्वीन'आणि 'तनु वेड्स मनू रिटर्न्स'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशी पोस्ट फिल्मफेयरने केली. तर कंगनाच्या बेताल वक्तव्यामुळे फिल्मफेअरने २०२२ मध्ये कंगनाचं बेस्ट अभिनेत्री म्हणून नॉमिनेशन मागे घेतलं होतं. (Bollywood Film)
फिल्मफेअरने कंगनाचं नॉमिनेशन मागे घेतल्यावर कंगनाच्या जीवाचा चांगलाच तिळपापड झाला होता. कंगनाने तिच्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली, "फिल्मफेयरने शेवटी माझं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नॉमिनेशन मागे घेतलं आहे. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धच्या या लढ्यात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानते. पण मी हा अन्याय सहन करणार नाही. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहे... असे अनैतिक पुरस्कार सोहळा बंद करण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे." असं लिहून फिल्मफेअरला कोर्टात खेचण्याची तयारी ही तिने दाखवली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.