Actor Chrisann Pereira Released: कुटुंबाच्या प्रयत्नांना यश; अभिनेत्री क्रिसॅन परेराची अखेर दुबईच्या जेलमधून सुटका

Chrisann Pereira released Jail: अभिनेत्री क्रिसॅन परेराची बुधवारी संध्याकाळी शारजाह तुरुंगातून सुटका करण्यात आली.
Actor Chrisann Pereira released from Sharjah jail
Actor Chrisann Pereira released from Sharjah jailInstagram @chrisannpereira

सचिन गाड

Actor Chrisann Pereira released from Sharjah Jail: 'सडक २' चित्रपटातील अभिनेत्री क्रिसॅन परेराला दुबईतील शारजाहमध्ये अटक करण्यात आली होती. ड्रग्स बाळगल्या प्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. आता तिची या प्रकरणातून सुटका करण्यात आली आहे. क्रिसॅन परेरा लवकरच भारतात परतेल.

अभिनेत्रीला संयुक्त अरब एमिरेट (युनाइटेड अरब एमिरेट) शारजाह सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी तिला ड्रग्जच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

शारजाह विमानतळावर उतरल्यापासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यानंतर तिच्या कुटूंबाने तिला यातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

Actor Chrisann Pereira released from Sharjah jail
Chrisann Pereira Arrested In UAE: 'सडक २' फेम अभिनेत्री अडचणीत; अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात क्रिशन परेराला दुबईत अटक

क्रिसॅन परेरा खोट्या ड्रग्स केस मध्ये अडकवण्यात आले होते. तिच्या कुटुंबाचे देखील हेच म्हणणे होते. अखेर अभिनेत्री क्रिसॅन परेराची बुधवारी संध्याकाळी शारजाह तुरुंगातून सुटका करण्यात आली. तिचा भाऊ केविन तिच्या सुटकेसाठी अतोनात प्रयत्न करत होता. (Latest Entertainment News)

क्रिसॅनने सुटकेनंतर तिने आईसोबतचा व्हिडीओ कॉल देखील केला. तिच्या सुटकेनंतर घरातील सगळ्यांना किती आनंद झाला हे दाखवणार व्हिडिओ तिच्या भावाने शेअर केला आहे. पुढील ४८ तासांत क्रिसॅन भारतात परतू शकते.

या व्हिडिओमध्ये क्रिसॅनची आई उद्या मारताना दिसत आहे. तर अभिनेत्री खूप भावुक झाली आहे. तिचा भाऊ तिला धीर देताना दिसत आहे. क्रिसॅनचा भाऊ तिला म्हणतो चांगल्या माणसांना देव नेहमीच वाचवतो. तू काहीही वाईट केलं नव्हतं. लवकर घरी ये आम्ही तुझी वाट पाहत आहोत.

क्रिशन परेराचे कुटुंब कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. एवढेच नाही तर त्यांनी दुबईत एका स्थानिक वकिलाची नियुक्ती केली आहे. ज्याची फी सुमारे 13 लाख रुपये आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबाला ती सुरक्षित हवी आहे. त्यासाठी तिचे कुटुंबीय सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आणि क्रिसॅन निर्दोष मुक्तता झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com