Vishal Pandey Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vishal Pandey Accident: नस कापली, पॅरालाईज होता होता वाचला; 'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा शूटींग दरम्यान गंभीर अपघात

Bigg Boss Fame Vishal Pandey Accident: बिग बॉस ओटीटी 3 चा प्रसिद्ध स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विशाल पांडे याला शूटिंगदरम्यान एक गंभीर अपघात झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Fame Vishal Pandey Accident: बिग बॉस ओटीटी 3 चा प्रसिद्ध स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विशाल पांडे याला शूटिंगदरम्यान एक गंभीर अपघात झाला आहे. विशालने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हॉस्पिटल बेडवरील काही फोटो शेअर करून या घटनेची माहिती दिली. त्याने सांगितले की, शूटिंगदरम्यान काचेमुळे त्याच्या शरीरातील काही नसा कापल्या गेल्या, त्यामुळे त्याच्या शरीराला पॅरालाईज होण्याचा धोका निर्माण झाला होता.

विशालने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "शूटिंगदरम्यान काचेमुळे मी आपली नस कापली. डॉक्टरांनी सांगितले की, जर जरा जास्त जखम झाली असती, तर माझ्या शरीराला पॅरालाईज होऊ शकला असता." त्याने दोन ऑपरेशन केल्यानंतर आता तो रिकव्हर होत आहे. विशालने आपल्या चाहत्यांना दिलासा देताना म्हटले की, "या छोट्या अडथळ्यामुळे मी थांबणार नाही. मी पुन्हा उभा राहीन आणि माझं काम सुरू ठेवीन."

विशालच्या या अपघातामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली आहे. त्याच्या पोस्टला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. त्याच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना त्याचे चाहते करत आहे. विशाल लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कामावर परत येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

विशाल पांडे याच्या या अपघातामुळे शूटिंगच्या वेळी कलाकारांच्या सुरक्षिचे प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात येत आहेत. उत्साही कलाकारांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना आणि काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: 'आजी खूप दुखतंय', ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत नेमकं काय घडलं?

Horoscope: कभी खुशी कमी गम! संकटाचे सावट; नातेवाईकांची मिळेल साथ, वाढेल मैत्री, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Maharashtra Live News Update: जालन्यातील अंबड तालुक्यातील बळेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस

Face Care Tips: चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे कोणती?

Mumbai Dam Water Level: आनंदाची बातमी! मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं ९९ टक्के भरली, वर्षभराची चिंता मिटली

SCROLL FOR NEXT