Virat kohli and anushka sharma  saam tv
मनोरंजन बातम्या

Virat Kohli And Anushka Sharma: फॅन्सच्या या भयावह कृत्यावर भडकले विराट आणि अनुष्का

विराटच्या बेडरूमचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनुष्का शर्माने सुद्धा राग व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of Virat: भारतीय क्रिकेट टीम सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात गेली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर विराट कोहलीच्या बेडरूमचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या बेडरूमचा हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. विराटच्या बेडरूमचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनुष्का शर्माने सुद्धा राग व्यक्त केला आहे.

भारतीय क्रिकेटर विराट कोहलीच्या हॉटेलमधील खोलीत जाऊन एका चाहत्याने विराटचे सामान दाखवत संपूर्ण खोलीचा व्हिडिओ बनवला आहे. तसेच त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्यक्तीने व्हिडिओवर 'किंग कोहलीची हॉटेल रूम' असे लिहिले आहे. (Viral Video)

अनुष्का शर्माने विराट कोहलीचा तो व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने व्हिडिओसोबत लिहिले की, 'मी यापूर्वी असे प्रसंग पाहिले आहेत, जेव्हा फॅन्सनी काहीही विचार न करता अशी कृत्ये केली आहेत, परंतु खरंतर हे खूप वाईट आहे. काही लोक सेलिब्रेटींकडे पाहूनअसा विचार करतात की, डील करावी लागेल. तुम्हाला हे लक्षात येत नाही की, तुम्ही खूप चुकीचे करत आहेत. जर कोणी तुमच्या बेडरूममध्ये घुसून असे केले तर तुम्हाला कसे वाटेल सांगा'. (Anushka Sharma)

Anushka Sharma Story About Viral Video

विराट कोहलीने देखील हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, 'मला इतकी समझ आहे की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि मी नेहमीच त्याचे कौतुक केले आहे. परंतु हा व्हिडिओ भयावह आहे आणि यामुळे मला माझ्या प्रायव्हसीविषयी चिंता वाटत आहे. जर मी माझ्या हॉटेलच्या खोलीतही सुरक्षित नाहीये तर मला सांगा आणखी काय अपेक्षा करू'. (Virat Kohli)

विराट आणि अनुष्का त्यांच्या प्रायव्हसीबाबत खूप दक्ष आहेत. याआधीही त्यांनी आपली मुलगी वामिकाचा चेहरा दाखविण्याविषयी मीडियाला फटकारले होते. हे जोडपे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि जवळपास प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

SCROLL FOR NEXT