Viral Video : ऑस्करवर नाव कोरलेल्या नाटू - नाटू या गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. भारतातच नाही तर देशभरात या गाण्याचे चाहते आहेत. नुकतेच या गाण्याला ओरिजनल गाण्याची उपाधी देण्यात आली. सोशल मीडियावर सर्वत्र याच गाण्याची चर्चा आहे. अनेक व्यक्ती या गाण्यावर रील्स व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. अशात आता या गाण्याची भूरळ चार चाकी वाहनांना देखील पडली असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (RRR)
नाटू नाटू हे गाणं फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात गाजत आहे. या गाण्यावर टेस्ला कार देखील नाचल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका पार्कींग परिसरात टेस्ला कार नाटू-नाटू या गाण्याच्या ठेक्यावर लाईट्सचा वर्षाव करून नाचत आहेत.
अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात या टेस्ला कार लाइट शोचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरात सर्वत्र मोठ्या आवाजात नाटू नाटू हे गाणं लावण्यात आलं होतं. मोठ्या आवाजात या गाण्याच्या तालावर गाणं जसं वाजत आहे त्याच प्रमाणे कारमध्ये लाईट्स चमकवण्यात आली आहे. हा अनोखा डान्स तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे.
राजामौली यांच्या RRR Movie या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, " ऑस्कर विजेत्या नाटू-नाटू या गाण्यासाठी टेस्ला लाईट शो. सर्वांचे धन्यवाद... हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. RRR चित्रपटाचे लाखो चाहते आहेत. हा व्हिडिओ पाहून चाहते यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
पार्कींंग परिसरात कारच्या हेडलाईट्स वापरून केलेला हा डान्स खरोखर भन्नाट आहे. या संकल्पनेला सलाम, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. जगभरातील सर्वच प्रेक्षकांना भुरळ घालणारं हे गाणं पहिल्यांदा तमिळ भाषेत बनवण्यात आलं. सोबतच हा चित्रपट हिंदी भाषेत बनवण्यात आला असून हिंदीतही त्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या गाण्याने चित्रपटाला एक वेगळेच स्थान मिळवून दिले आहे. अशातच हा चित्रपट ज्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला, त्या भाषांमध्ये त्याची म्युझिक, रिदम आणि डान्सच्या हूक स्टेप्स सारख्याच ठेवल्या आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.