neha kakkar mimicry Saam Tv
मनोरंजन बातम्या

Video : व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही; तरुणीने चक्क नेहा कक्कडच्या आवाजात ऑर्डर केला पिझ्झा

एका युवतीने चक्क प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडच्या आवाजात पिझ्झा ऑर्डर केला आहे. या युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Viral Video News : मोबाईलमधील अॅपच्या माध्यमातून आपण आता सहज जेवणाची ऑर्डर करू शकतो. ऑर्डर करताना आपण मागवणार असलेल्या जेवणाची किंमत देखील उपलब्ध असते. अॅपच्या माध्यमातून ग्राहक आरामात घरबसल्या जेवणाची ऑर्डर करता येते. अनेक जण फोन करून ऑर्डर करून टाळाटाळ करतात. मात्र, एका युवतीने चक्क प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडच्या आवाजात पिज्जा ऑर्डर केला आहे. या युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेली नोएडा येथे राहणारी गायिका आणि गीतकार प्रांजलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रांजली कॉल करून पिझ्झा ऑर्डर करताना दिसत आहे.

मात्र, प्रांजली पिझ्झा स्वत:च्या नावाने नाही, तर गायिका नेहा कक्कडच्या आवाजात देत आहे. प्रांजलीने व्हिडिओ शेअर करून 'नेहा कक्कड पिझ्झा ऑर्डर कशी करते?', असं कॅप्शन दिलं आहे.

नेहा कक्कडच्या आवाजात पिज्जा केला ऑर्डर

व्हिडिओमध्ये तरुणी डॉमिनोजमध्ये कॉल करते. त्यानंतर ऋतिक नावाचा कर्मचारी कॉल उचलून पिझ्झा ऑर्डर विषयी बोलण्यास सुरुवात करतो. मात्र, प्रांजली पिझ्झा ऑर्डर देण्याऐवजी गाणे गाण्यास सुरुवात करते. तेही नेहा कक्कडच्या आवाजात गाणे (Song) गाण्यास सुरुवात करते. त्यांचा आवाज नेहा कक्कड सारखा देखील वाटत आहे.

प्रांजली गाताना म्हटले,'तुम्हाला ऑर्डर आवडते, मला ऑर्डरमध्ये पिझ्झा'. हे गाणं गायल्यानंतर कॉल उचलण्याऱ्याची झोप उडते. त्यानंतर कॉल उचलणारा ऋतिक प्रांजलीकडे ऑर्डरविषयी विचारतो. त्यानंतर प्रांजली पुन्हा गाणं गाऊन चीज पिझ्झाची ऑर्डर करते. प्रांजली स्वत: चं नाव देखील नेहा कक्कड सांगते. प्रांजलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT