Vikram Gokhale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vikram Gokhale : चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली; दिग्गजांकडून शोक व्यक्त

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vikram Gokhale Passes Away - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आज (शनिवारी) त्यांचे निधन झाले. विक्रम गोखले (Vikram Gokhale)  यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. विक्रम गोखले यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सर्वस्तरांतून विक्रम गोखले यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. 

रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले.त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले.भावपूर्ण श्रद्धांजली असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी, शरद पवारांची प्रतिक्रिया

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

मनाला चटका लावणारी घटना- उद्धव ठाकरे

विक्रम गोखले गेले याचा विश्वास बसत नाही. काल परवपर्यंत ते तसे संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असतं. एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. ते हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचें जाणे मनाला चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते.पण दुर्दैव. मी या महान अभीनेत्याला आदरांजली अर्पण करतो असे ट्विट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

चालते-बोलते विद्यापीठ हरपले - देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे.

एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते. भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा.

विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्‍या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्‍या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. काही चित्रपट व नाटके केवळ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे लोकांच्या लक्षात आहेत. सामाजिक प्रश्नांवर देखील गोखले यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. अलीकडेच दिनांक १५ ऑगस्ट रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, परंतु दुर्दैवाने ती भेट शेवटची ठरली. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

निष्ठावान कलातपस्वी हरवला- सुधीर मुनगंटीवार

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मराठी रंगभूमी , मराठी व हिंदी चित्रपट , मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शन देखील केले आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यात विक्रम गोखले यांचे नाव अग्रणी स्थानावर घेतले जाते. या कलातपस्वी व्यक्तिमत्वाने मराठी रंगभूमी सह मराठी व हिंदी चित्रसृष्टीसह मलिका क्षेत्र देखील गाजवले . त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं - चंद्रकांत पाटील

ज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. तसेच त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीच नव्हे तर चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात त्यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT