Vikram Gokhale - Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vikram Gokhale Health Update: विक्रम गोखलेंची प्रकृती पुन्हा खालावली, अद्यापही व्हेंटिलेटरवरच

पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी रुग्णालय प्रशासनानं मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vikram Gokhale Health Update : पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी रुग्णालय प्रशासनानं मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती पुन्हा खालावली असून, अद्याप ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

पुण्याच्या दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी काल, शुक्रवारी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे, ते डोळे उघडत आहेत, तसेच त्यांच्या हात आणि पायांची हालचाल होत असल्याची माहिती देण्यात आली होती.

लवकरच व्हेंटिलेटर काढण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, आज, शनिवारी रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली असून, पुन्हा गोखले यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात आले.

'विक्रम गोखले हे अद्यापही व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सध्या रक्तदाबाचे औषध सुरू केले,' अशी माहिती काही वेळापूर्वी रुग्णालय प्रशासनाकडून मेडिकल बुलेटिनद्वारे देण्यात आली.

विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत गुरुवारी अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. गोखलेंच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांची टीम शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

विक्रम गोखलेंच्या पत्नींनी केलं होतं आवाहन

'ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा,' असं आवाहन त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांकडून चाहत्यांना करण्यात आले होते.

विक्रम गोखलेंना नेमकं काय झालं होतं?

विक्रम गोखले यांना बऱ्याच दिवसांपासून मधुमेहाचा त्रास होत होता. त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी दोन अश्व सज्ज

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT