Amitabh Bachchan: हायकोर्टाचा हॅकर्सला दणका, खबरदार 'बच्चन यांचा आवाज वापरला तर...'

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज, नाव आणि चेहरा सोबतच त्यांच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर करू नये असे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
Amitabh Bachchan Delhi High Court
Amitabh Bachchan Delhi High CourtSaam Tv
Published On

Amitabh Bachchan: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज, नाव आणि चेहरा सोबतच त्यांच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर करू नये, तसे केले तर संबंधितांना कारवाईकरिता सामोरे जावे लागेल असे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

Amitabh Bachchan Delhi High Court
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, जाणून घ्या काय आहे कारण?

उच्च न्यायालयाने अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित बाबी हटविण्यासाठी दूरसंचार मंत्रालयासह संबंधित विभागालाही सांगण्यात आले आहे. आपल्यातील असलेल्या कलागुणांचा वापर कोणत्याही परवानगी शिवाय केला जात आहे, असे आक्षेप घेणारी याचिका बिग बी बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.

काही कंपन्या व संस्था आपले नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाचा गैर पद्धतीने वापर करत आहे. हे सर्वांसाठीच अत्यंत गैर व चुकीचे आहे, असे बच्चन यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. आता यात एका केंद्रीय मंत्रालयाचेही नाव आल्याने तो चर्चेचा विषय ठरलाय.

Amitabh Bachchan Delhi High Court
Kiccha Sudeep: किच्चाची उत्कृष्ट कामगिरी, घेणार ३१ गायी दत्तक

काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन यांच्या नावाने लॉटरीची जाहिरात देखील चालवली जात आहे. जिथे त्यांचा फोटो जाहिरात बॅनरवर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोबतच त्या बॅनरवर केबीसी चा लोगोही वापरण्यात आला आहे. लोकांचा भ्रमनिरास करण्यासाठी काही समाजकंटक अशा बॅनरचा वापर केला जात असल्याचा दावा बच्चन यांनी केला.

Amitabh Bachchan Delhi High Court
Sharad Ponkshe : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली...';राज्यपालांच्या वक्तव्यावर शरद पोंक्षे म्हणाले...

न्यायमूर्ती नवीन चावला म्हणाले की, "प्रथमदर्शनी हे प्रकरण बच्चनयांच्या बाजूने दिसत आहे. बच्चन यांच्या व्यक्तिमत्व अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप आहे. अशा परस्पर कुरघोडीमुळे त्यांची बदनामी होते, यात तथ्य असल्याचेही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

Amitabh Bachchan Delhi High Court
Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामलेंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बच्चन यांच्या वतीने युक्तिवादात सांगितले की केबीसी लॉटरी नोंदणी आणि लॉटरी विजेता कसे बनायचे, या जाहिरातीत 'कौन बनेगा करोडपती' चा लोगो परस्पर वापरला जात आहे. त्यात सर्वत्र फोटो बिग बींचेच आहेत. वस्तुतः ही लॉटरी म्हणजे एक प्रकारचा स्कॅम आहे. त्यात लोक पैसे जमा करत आहेत पण कोणीही जिंकत नाही. यात एक नकली आवाजही आहे, जो बच्चन यांच्या आवाजाशी तंतोतंत जुळणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com