Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, जाणून घ्या काय आहे कारण?

अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली होती.
Amitabh Bachchan Delhi High Court
Amitabh Bachchan Delhi High CourtSaam Tv
Published On

Amitabh Bachchan High Court Petition: बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे. न्यायाधीश नवीन चावला हे या दाव्यावर सुनावणी करणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध वकील हरीश साळवे अमिताभ बच्चन यांची बाजू मांडणार आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बौद्धिक संपत्तीचे रक्षण व्हावे यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या नावासाठी, आवाजासाठी आणि व्यक्तिमत्वाच्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे. व्यक्तिमत्व हक्काच्या संरक्षणासाठी दावा करणारे अमिताभ बच्चन हे पहिले कलाकार आहे.

Amitabh Bachchan Delhi High Court
Vikram Gokhale Health Update: विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, मेडिकल बुलेटिन जारी

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे सांगून त्यावर बंदी घातली आहे. अमिताभ बच्चन यांना दिलासा देताना न्यायमूर्ती नवीन चावला यांनी प्राधिकरण आणि दूरसंचार विभागाने त्यांचे छायाचित्र, नाव आणि व्यक्तिमत्त्व तत्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. (High Court)

अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली होती. अमिताभ यांचे म्हणणे आहे की, त्याचा चेहरा टी-शर्टवर दिसतोय तर कुठे त्याचा आवाज काढून लॉटरी घोटाळा केला जात आहे. इतकेच नाही तर त्याच्या KBC शोचा लोगो वापरून सोशल मीडियावर अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. (Amitabh Bachchan)

ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी त्यांचे क्लायंट अमिताभ बच्चन यांच्या बाजूने कोर्टाला विनंती केली की, बिग बींच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांचे नाव किंवा त्यांची ओळख वापरू नये. या सर्व प्रकरणांमुळे अभिनेत्याची प्रतिमा डागाळली असून ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

जगभरात अमिताभ बच्चन यांचे नाव आहे. त्यांच्या नाव, आवाज आणि व्यक्तिमत्व यांचा लोकांवर प्रभाव पडतो. परंतु काही कंपन्या अमिताभ यांचे व्यक्तिमत्व, दर्जा आणि नावाचा त्यांच्या परवानगीशिवाय गैरवापर करत आहेत, हे बेकायदेशीर आहे. अशा कृत्यांमुळे अमिताभ यांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे, असे सांगत त्यांनी अशा लोकांवर आणि कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com