Kiccha Sudeep: सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बरीच चर्चेत असते. टॉलिवूडने तर सर्व भारतात आपल्या चित्रपटांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि त्यांच्या खास शैलीने भारतातच नाही तर जगभरात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी चर्चेत आहे. सोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार ही चांगलेच चर्चेत असतात.
सध्या असाच एक आपल्या अभिनयासोबत आपल्या कामगिरीने भारतात चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. त्या दाक्षिणात्य अभिनेत्याचे नाव किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) आहे.
किच्चा नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. सध्या चर्चेत तो त्याच्या वादग्रस्त विधानांनी नाही तर एका उत्कृष्ट कामगिरीने चर्चेत आहे. किच्चाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे ती म्हणजे, पुण्यकोटी दत्तू योजनेच्या अंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा तब्बल ३१ गायी किच्चा सुदीप दत्तक घेणार आहे.
किच्चा सुदीपने कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री प्रभु बी चव्हाण यांच्या निवासस्थानी गुरुवारी गौ पुजा केली. गौ पुजा करताना त्याने गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकार करत असलेल्या कामांची प्रशंसा केली आहे. 'कर्नाटक राज्य सरकारने माझी पुण्यकोटी दत्तू योजनेच्या ब्रॅंड अॅम्बिसीडरपदी नियुक्ती करण्यात आली असल्याने माझ्या जबाबदारीत आणखी एक भर पडली आहे.'असे यावेळी किच्चा सुदीप म्हणाला.
२०२२ च्या सुरुवातीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ११ गायी घेतल्या आहेत, तर पशूसंवर्धन मंत्र्यांनी ३१ गायी दत्तक घेतल्या आहेत. हे पाहून मला ही गायी दत्तक घेण्याचा विचार आला. मी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातील एक गायी प्रमाणे असे एकूण ३१ गायी दत्तक घेणार असल्याचे किच्चा सुदीपने जाहिर केले आहे.
कर्नाटक राज्यातील गोहत्या बंद व्हावी यासाठी 'गोहत्या बंदी कायदा' लागू झाल्यानंतर राज्यात तब्बल १०० गोशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. पुण्यकोटी दत्तू योजना राबवणारं कर्नाटक हे राज्य पहिलं आहे. यात पशु कल्याण मंडळ, पशु हेल्पलाईन केंद्र, पशु संजीवनी रुग्णवाहिका, गोमाता सहकारी संस्था, आत्मनिर्भर गोशाळा असे अनेक उपक्रम राज्यात राबवले जात आहे. राज्यात या योजनेतून प्रत्येक गायीला देखभालीसाठी दरवर्षी ११ हजार रुपये देण्यात येणार आहे.
किच्चा सुदीप हे आज कन्नड चित्रपटांतील गाजलेले नाव आहे. किच्चाने फक्त कन्नडच नाही तर तामिळ, तेलगू, हिंदी चित्रपटांतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आज जगभरातील चाहते सुदीपला किच्चा सुदीप याच नावाने ओळखतात. पण सुदीपचे खरे नाव सुदीप संजीव आहे.
1997 वर्षात थैवा या चित्रपटात तो मुख्य अभिनेता म्हणून झळकला होता. पण त्याला खरी ओळख दिली ती ईगा अर्थात मक्खी या चित्रपटाने. त्याचा हा चित्रपट भारतात तुफान गाजला. बॉलिवूडमधील किच्चाने काही चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे.
किच्चा सुदीप आणि सलमान खान हे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांनी दबंग 3 चित्रपटात एकत्र कामही केले आहे. किच्चा सुदीपनं सलमानच्या या चित्रपटासाठी एकही रुपयाचे मानधनही घेतले नव्हते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.