Bigg Boss Marathi 4 Latest Update: भांडण, तंटा आणि मस्ती हे वेगळेच बिग बॉसच्या घरातील आहे. गेल्या ५० दिवसांपासून १६ स्पर्धक एकत्र खेळत आहेत. नेहमीच बिग बॉस स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही नवनवीन आश्चर्याचे धक्के देत असतात. असाच एक सुख:द धक्का बिग बॉसने सर्व स्पर्धकांना दिला आहे. खरतर हा धक्का घरातील सदस्यांसाठी आश्चर्याचाच धक्का म्हणावा लागणार आहे. पण येत्या वीकेंडच्या चावडीवर चार नवे वाइल्ड कार्ड सदस्य घरात एंट्री करणार आहेत.
बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे. याआधी बिग बॉस मराठीच्या घरात स्नेहलता वसईकरची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. या आठवड्यात येणारे चार स्पर्धक कोण असणार? ते घरात कधी एंट्री घेणार ? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रालाच आहे. लवकरच आपल्याला कळेल की हे सदस्य कोण असणार.
सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये "युद्ध कॅप्टन्सीचे" हा कॅप्टन्सी टास्क सुरु आहे.बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये कसे समोरच्या टीमला हरवता येईल याची परिपूर्ण तयारी करताना दिसत आहे. प्रसाद, तेजस्विनी आणि अमृता देशमुख आणि एका बाजूला समृद्धी, अक्षय आणि रोहित हे स्पर्धक. आता या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोण जिंकणार ? या आठवड्यातील कॅप्टन कोण बनणार हे आजचा भागात कळेलच.
काल अपूर्वा कॅप्टन्सी कार्यातून बाद झाली. तर रोहित आणि तेजस्विनी या आठवड्यातील कॅप्टन पदाचे उमेदवार ठरले आहेत. तर, बिग बॉसने वारंवार ताकीद देऊनही स्पर्धक उत्साहाच्या भरात आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. स्पर्धकांनी आक्रमकतेवर नियंत्रण न ठेवल्यामुळे विकास आणि रोहित बिग बॉसच्या दंडास पात्र ठरले आहेत. बिग बॉसने पुढील आदेश येईपर्यंत जेलमध्ये राहण्यासाठीच सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व स्पर्धकांना चांगलाच धक्का बसणार आहे.
नुतकाच सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरात चार नव्या सदस्यांची वाइल्ड कार्ड एंट्री होताना दिसत आहे. या स्पर्धकांच्या एंट्रीने घरातील स्पर्धक मात्र चांगलेच खुश झालेले पाहायला मिळाले. हे स्पर्धक येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचे मोठ्या आनंदाने स्वागत करताना दिसत आहे.
या वाइल्ड कार्डने एन्ट्री झालेल्या स्पर्धकांमुळे घरात पुढील कसा खेळ अवघड होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेणारे हे चार चेहरे नक्की कोण आहेत ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या स्पर्धकांची नावं अजून समोर आली नसली तरी त्यांचे येण्याने खेळात आणखीनच रंगत येणार हे नक्की..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.