Liger  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Liger Movie Collection: विजय देवरकोंडाचा 'लायगर' बॉक्स ऑफिसवर लढलाच नाही!

विजय देवरकोंडाला त्याच्या 'लायगर' या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. परंतु त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करू शकला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) बहुचर्चित चित्रपटही आधीच्या चित्रपटांसारखाच अपयशी ठरला आहे. विजय देवरकोंडाला त्याच्या 'लायगर'(Liger) या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. परंतु त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करू शकला नाही. 'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षाबंधन' प्रमाणे 'लाइगर'ही अपयशी ठरला आहे. चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा होणार आहे, अद्याप या चित्रपटाने ५० कोटींचा आकडाही पार केलेला नाही.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या 'लायगर' या चित्रपटालाही अन्य बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे प्रेक्षकांनी नाकारले आहे. या चित्रपटासाठी विजय देवरकोंडाने खूप मेहनत घेतली होती. पण त्याची मेहनत प्रेक्षकांना काही विशेष आवडली नाही असे दिसते. सुमारे १२५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'लायगर' हा चित्रपट सहा दिवसांत ५० कोटींचाही टप्पा पार करू शकला नाही.

विजय देवरकोंडाने 'लायगर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पण विजयचे हे पदार्पण पूर्णपणे फ्लॉप ठरले. 'लायगर'मध्ये 'बाहुबली' या चित्रपटातील शिवगामी देवीची भूमिका साकारणाऱ्या रम्या कृष्णननेही मुख्य भूमिका साकारली आहे, मात्र तिच्या अभिनयाचाही प्रेक्षकांवर फारसा प्रभाव पडला नाही. 'लायगर' हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला असून धर्मा प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे.

चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, पाचव्या दिवशी 'लाइगर'ने सुमारे २.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. परंतु, सहाव्या दिवशी चित्रपटाची कमाई २ कोटींपेक्षा कमी होती. 'लायगर'च्या प्रोमोशनमध्ये कलाकार आणि निर्मात्यांनी कोणतीही कसर सोडली नव्हती, पण तरीही पहिल्या दिवसापासून चित्रपटाच्या व्यवसायात घसरण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT