मुंबई : आज संपूर्ण महाराष्ट्रभर गणपती बाप्पाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन झाले आहे. कोरोना महामारीनंतर तब्बल २ वर्षांनंतर प्रत्येक भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत(Ganesh Chaturthi 2022) करत आहे. आजपासून पुढील १० दिवस प्रत्येक भाविक बाप्पाची मनोभावे सेवा करणार आहे. अशात आपले मराठी कलाकार कसे मागे राहतील? आज गणरायाच्या आगमनामुळे कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. असाच आपला एक मराठमोळा कलाकार आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एनर्जी मॅन सिद्धार्थ जाधवने(Siddharth Jadhav) ढोल वादन करत गणरायाचे स्वागत केले आहे.
अनेक कलाकार ढोल तशा पथकात सहभागी आहेत. अभिनयासोबतच आपली अजून एक आवड जोपासत मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार वादन पथकाचा भाग आहेत. सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवही आपली ही आवड जोपासत आज एका ढोलताशा पथकात ढोलवादन करताना दिसला. ढोल ताशांच्या निनादात दंग झालेल्या सिद्धार्थच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या आगमनाचा आनंद दिसत होता. सिद्धार्थला अभिनयासोबतच विविध कलांमध्ये रुची आहे.
सिद्धार्थ जाधवला महाविद्यालयात असल्यापासूनच अभिनय क्षेत्रात आपलं करिअर करायचे होते. मराठी नाटक, मलिक, सिनेमा, रियालिटी शो असा लांबचा पल्ला त्याने पार केला आहे. सिद्धार्थने रणवीर सिंगच्या 'सिम्बा' या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसेच सिद्धार्थ जाधवचा अलीकडेच महेश मांजरेकर दिग्दर्शित 'दे धक्का २' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.